शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

आयकर प्रकरणात माजी मंत्री सतीश चतुर्वेदींना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:57 AM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २००५ मधील आयकरसंदर्भातील प्रकरणात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना नोटीस बजावून १३ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

ठळक मुद्देहायकोर्ट : १३ एप्रिलपर्यंत मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २००५ मधील आयकरसंदर्भातील प्रकरणात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना नोटीस बजावून १३ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.याविषयी आयकर विभागाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. आयकर विभागानुसार, चतुर्वेदी यांनी एकूण १५ लाख ७८ हजार रुपये उत्पन्न दाखवून ३१ आॅक्टोबर २००५ रोजी आयकर जमा केला होता. त्यानंतर आयकर विभागाच्या तपास कक्षाला महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांची माहिती मिळाली. त्यामुळे पुढील तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला. तपासानंतर चतुर्वेदी यांचे एकूण उत्पन्नांचे ९८ लाख ६० हजार रुपये मूल्यांकन करण्यात आले. त्याविरुद्ध चतुर्वेदी यांनी आयकर अपिलीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले होते. त्यांचे अपील मंजूर करण्यात आले. त्या निर्णयाला आयकर विभागाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. विभागातर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSatish Chaturvediसतीश चतुर्वेदी