शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

दुपट्टा नव्हे, हेल्मेट वापरा

By admin | Updated: February 23, 2016 03:23 IST

चेहऱ्यावर दुपट्टा बांधण्यापेक्षा, हेल्मेट वापरा असा संदेश देत सोमवारी वाहतूक पोलिसांनी सुमारे १६२ दुचाकीचालकांवर

नागपूर : चेहऱ्यावर दुपट्टा बांधण्यापेक्षा, हेल्मेट वापरा असा संदेश देत सोमवारी वाहतूक पोलिसांनी सुमारे १६२ दुचाकीचालकांवर कारवाई केली. शहरात हेल्मेटला घेऊन सक्तीची कारवाई सुरू नसली तरी जनजागृती म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.हेल्मेटसक्तीला घेऊन नागपुरात २००५ नंतर पहिल्यांदाच एकाच दिवशी ७ हजार २६३ वाहनचालकांवर कारवाई झाली. परंतु हेल्मेट विकत घेण्यासाठी वेळ न देता कारवाई सुरू केल्याची ओरड झाल्याने व हेल्मेटच्या काळाबाजाराला आलेला ऊत पाहून काही दिवस कारवाई शिथिल करण्यात आली. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा कारवाईला वेग आला आहे. सोमवारी वर्धा रोड, महाराजबाग रोड, धरमपेठ रोड, सीताबर्डी, सदर या परिसरात चेहऱ्याला दुप्पटा बांधून दुचाकी चालविणाऱ्यांना थांबविण्यात आले. त्यांना दुपट्ट्याऐवजी हेल्मेट घाला. हेल्मेटमुळे चेहऱ्यासोबतच जीवाचीही सुरक्षा होईल, असे समुपदेशन करीत चालान फाडले. दिवसभरात १६२ चालकांवर ही कारवाई करण्यात आली. हेल्मेटसोबतच पोलिसांनी सीटबेल्ट, सिग्नल जम्पिंग, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, फॅन्सी नंबरप्लेट अशा दोषी आढळून आलेल्या वाहनचालकांवरही कारवाई केली. हा कारवाईचा आकडा हजारावर असल्याची माहिती आहे. एका अधिकाऱ्याने रोज साधारण १०० दुचाकीस्वारांवर हेल्मेटची कारवाई होत असल्याचे सांगितले. सध्या वाहतूक विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी रजेवर आहेत. यामुळे १ मार्चपासून सक्तीची कारवाई होणार असल्याची सूत्राची माहिती आहे. (प्रतिनिधी)