शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

गोळाबेरीज नाही!

By admin | Updated: May 27, 2014 01:42 IST

लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उमेदवारांना असलेली खर्च मर्यादा, खर्चाचा हिशेब सादर करण्याचे बंधन आणि कठोर आचारसंहिता विधान परिषदेच्या पदवीधर

 आचारसंहिता निर्बंधही शिथिल : पदवीधर मतदारसंघ निवडणूक

नागपूर: लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उमेदवारांना असलेली खर्च मर्यादा, खर्चाचा हिशेब सादर करण्याचे बंधन आणि कठोर आचारसंहिता विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात असणार नाही. या निवडणुकीची खर्च मर्यादा अद्याप ठरली नाही, दैनंदिन खर्चाचा हिशेबही देण्याची गरज नाही आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणे आचारसंहितेचे कठोर बंधनही असणार नाही. सोमवारी या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे पालन करताना उमेदवारांच्या नाकीनऊ आले होते. प्रचार खर्चालाही ७० लाखाची मर्यादा होती आणि त्याचा हिशेबही उमेदवारांना दैनंदिन स्वरुपात सादर करायचा होता. लोकसभेनंतरच विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. सहा जिल्ह्यांमिळून एक मतदारसंघ असलेल्या या निवडणुकीची अधिसूचना २६ मे रोजी अधिकृतरीत्या आयोगाने जारी केली. मात्र जाचक अटी या निवडणुकीत नसल्याने उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. प्रचाराची खर्चमर्यादा अद्याप ठरली नाही आणि उमेदवारांना दैनंदिन खर्चाचा हिशेबही सादर करावा लागणार नाही, आचारसंहिताही लोकसभेप्रमाणे कठोर असणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी व विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीत प्रशासनातर्फे ज्या पद्धतीने तयारी करण्यात आली. यावेळी त्यात किचिंत बदल करण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून विभागातील प्रत्येक जिल्ह्यात उमेदवारांना त्यांचे अर्ज सादर करता येतील व माघार घेण्याचे अर्जही तेथेच सादर करता येतील. एका उमेदवाराला चार अर्ज भरावे लागतील. अर्जावर १० सूचक असावे आणि त्यांची नावे पदवीधरांच्या मतदार यादीत असावीत. अर्ज आणि त्यासोबत लागणार्‍या शपथपत्राचे नमुने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध असून ते नि:शुल्क दिले जातील. सर्वसाधारण गटातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम १० हजार रुपये तर मागासवर्गीयांसाठी पाच हजार रुपये आहे. उमेदवारांचे वय ३० किंवा त्यापेक्षा अधिक असावे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. निवडणुकीसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार यांची केंद्राध्यक्ष व प्रथम श्रेणी लिपिक किंवा लेखापाल/निरीक्षक यांची मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ज्या केंद्रात ९०० पेक्षा कमी मतदार आहेत तेथे चार तर जेथे ९०० पेक्षा अधिक मतदार आहेत त्या ठिकाणी पाच कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस खात्याशी चर्चा सुरू आहे. मतमोजणी स्थळ अद्याप निश्चित झाले नाही. पण मोजणी नागपुरातच केली जाणार आहे, असे अनुपकुमार म्हणाले. निवडणुकीसाठी कर्मचार्‍यांना ९ जून आणि १४ जून रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात आतापर्यंत एकूण २ लाख ७७ हजार ७४ मतदारांची नावे असून नव्याने नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या पदवीधरांनी अद्याप नाव नोंदवले नसेल त्यांनी त्यांची नावे या मोहिमेत नोंदवून घ्यावी, असे आवाहन अनुपकुमार यांनी केले. पत्रकार परिषदेला उपायुक्त (सामान्य प्रशासन) बाळासाहेब धुळाज, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रदीप डांगे यांच्यासह इतरही अधिकारी यावेळी उपस्थित होते.(प्रतिनिधी)