'नॉट रिचेबल' अजित पवार तिसऱ्या दिवशी अधिवेशनात आले; कामकाजातही सहभागी झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 06:26 IST2024-12-19T06:26:06+5:302024-12-19T06:26:35+5:30
वित्तखाते मिळावे म्हणून ते सोमवारी दिल्लीत गेल्याचीही चर्चा होती.

'नॉट रिचेबल' अजित पवार तिसऱ्या दिवशी अधिवेशनात आले; कामकाजातही सहभागी झाले
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : हिवाळी अधिवेशनाकडे दोन दिवस पाठ फिरवलेले उपमुख्यमंत्री अजित पवार तिसऱ्या दिवशी विधानभवनात दाखल झाले आणि त्यांनी कामकाजातही सहभाग घेतला.
अजित पवारांना वित्त खाते मिळणार नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा त्यामुळे सुरू होती. अखेर बुधवारी सकाळी १०.४० वाजता अजित पवार यांचे विधानभवनात आगमन झाले. मात्र माध्यमांना टाळण्यासाठी ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेल्या गेटने आपल्या दालनात गेले. त्यानंतर त्यांनी दिवसभरात काय कामकाज आहे याची माहिती घेतली. नाराजीबाबत येणाऱ्या बातम्यांवर उद्विग्न होत 'मी आजारपण पडायचे नाही का?' असा सवाल विचारला.
वित्तखाते मिळावे म्हणून ते सोमवारी दिल्लीत गेल्याचीही चर्चा होती. मात्र पक्षाने ते नागपुरातच होते. त्यांना घशाचा संसर्ग झाल्याने ते आराम करत होते, असे स्पष्ट केले आहे.