शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

वृद्धाश्रम नव्हे, या तर ‘समाधान’ देणाऱ्या माणुसकीच्या भिंती...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 12:27 AM

पल्लवी हुमनाबादकरांनी उभारले ज्येष्ठांसाठी अनोखे घर

ठळक मुद्देत्यांना इथे आल्यानंतर घराची आठवणही येत नाही

बालाजी देवर्जनकर 

नागपूर : ‘आज्जू जेवलीस का गं? आजोबा काय हवंय तुम्हाला. टीव्ही लावू का? चेस, कॅरम खेळायचाय का, की सापशिडी आणू? बाहेर गार्डनमध्ये फिरायला जाऊयात का? मी आहे ना सोबत.’ आजारग्रस्त, दुर्धर व्याधींनी ग्रस्त असलेल्या आजी-आजोबांच्या नागपुरातील हक्काच्या घरातील हा रोजचा संवाद. या मायेच्या घराचे नाव आहे ‘समाधान.’ पल्लवी हुमनाबादकर यांनी उभारलेल्या माणुसकीच्या या भिंतींआड जगताना या ज्येष्ठांना आगळे समाधान लाभते. मुलगी, सून होऊन काळजी घेणाऱ्या पल्लवी जणू त्यांच्या वार्धक्याची काठी बनल्या आहेत. महिला दिनी त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम.

प्रसिद्धीपासून दूर सोमलवाड्यातील पायोनिअर सोसायटीतील क्रमांक ३५ या घरावर तुम्हाला कुठलाही फलक दिसणार नाही. पल्लवी यांचे पती सुजित मुंबईला कंपनीत नोकरी करायचे. काही वेगळे करायला हवे, असा ध्यास घेऊन दोघांनीही मुंबई सोडली अन् जगण्याचे ‘समाधान’ शोधले. आता विदर्भच नव्हे तर पुण्या-मुंबईतूनही त्यांना कॉल येतात. ‘समाधान’ हे वृद्धाश्रम मुळीच नाही, रुग्णालयही नाही. पण, मानसिक आधाराचे आनंददायी घर नक्कीच आहे. मुलगा, मुलगी किंवा सून यांना नको म्हणून त्यांना या ठिकाणी सोडले असावे, असे तुम्हाला वाटेल. जण तसे मुळीच नाही. उच्चपदस्थ राहिलेले तसेच सामान्य घरातील अनेक वृध्द येथे आयुष्याची सायंकाळ व्यतीत करीत आहेत. सर्वांची काळजी इथे घरासारखीच घेतली जाते. 

समाधानाच्या शोधात, गोव्याहून नागपुरात ‘समाधान’मध्ये सेवा देणाऱ्या मीरा आजी तशा मूळच्या गोव्यातील. पण, त्यांना सेवेची आवड. त्यांना वयोवृद्धांची सेवा करायची होती. नागपूरचे ’समाधान’ आवडले. त्याही सेवेत मग्न असतात. चहापासून ते त्यांच्या आवडीनिवडीच्या चविष्ट जेवणाची काळजी त्या घेतात. समाधानच्या त्या ‘अन्नपूर्णा’च आहेत. 

त्यांना इथे आल्यानंतर घराची आठवणही येत नाही

अल्झायमर, कॅन्सर, मानसिक आजाराने ग्रस्त, अपघातग्रस्त, पॅरालिसिस अशा अनेक दुर्धर व्याधी असलेले, अगदी व्हेंटिलेशनवर असलेले आजी-आजोबा इथे येतात. वार्धक्य म्हटलं की त्यांच्या प्रत्येक आवडीनिवडी जपाव्या लागतात. त्यांच्या कलाने सगळे करावे लागते.

समाधान हे आहे की त्यांना इथे आल्यानंतर घराची आठवण येत नाही. आजवर पन्नासहून अधिक जण इथे राहिलेत, राहून घरी गेले आहेत. राहणाऱ्यांना वयाचे बंधन नाही. सर्वांच्याच सेवेसाठी नर्सेस, अटेंडेंट आहेत. कॉलवरील डॉक्टर सेवा देतात, असे पल्लवी सांगतात.

टॅग्स :nagpurनागपूरHomeघर