खंडव्यात नॉन ईंटरलॉकिंग; नागपूर विदर्भात धावणाऱ्या गाड्या प्रभावित
By नरेश डोंगरे | Updated: July 18, 2024 19:37 IST2024-07-18T19:36:48+5:302024-07-18T19:37:17+5:30
पुनर्विकास कामांचा फटका : नागपूर-विदर्भातून धावणाऱ्या आठ गाड्या रद्द

खंडव्यात नॉन ईंटरलॉकिंग; नागपूर विदर्भात धावणाऱ्या गाड्या प्रभावित
नागपूर : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सुरू असलेल्या पुनर्विकास कामांचा फटका नागपूर-विदर्भातून धावणाऱ्या गाड्यांना बसला आहे. या विकास कामांमुळे ८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
भुसावळ विभागात भुसावळ-खंडवा रेल्वे स्थानकादरम्यान पुनर्विकासाचे काम सुरू असून त्या अंतर्गत नॉन इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक केला जाणार आहे. त्यामुळे २२ जुलैला खालील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
०१३६९ बडनेरा - नरखेड़ मेमू
०१३७० नरखेड़ - बडनेरा मेमू
०१३६७ बडनेरा – नरखेड़ एक्सप्रेस
०१३६८ नरखेड़ - बडनेरा एक्सप्रेस
०१३२४ आमला – नागपूर एक्सप्रेस
०१३२३ नागपूर – आमला एक्सप्रेस
०१२०३ नागपूर - आमला एक्सप्रेस
०१२०४ आमला – नागपूर मेमू
प्रवाशांना सहकार्याचे आवाहन
या घडामोडीमुळे आधीच तिकिट काढून ठेवलेल्या आणि २२ जुलैला प्रवासाचे नियोजन करून ठेवणाऱ्या हजारो प्रवाशांना मनस्ताप होणार आहे. ते लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. भविष्यात चांगल्या सोयी-सुविधांसाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.