सासू-सासरे नको; हवा राजाराणीचा संसार; पत्नीला पोटगी देण्यास खंडपीठाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 08:35 IST2023-05-23T08:35:18+5:302023-05-23T08:35:25+5:30

प्रकरणातील दाम्पत्य नागपूरचे असून, त्यांचे १८ एप्रिल २०१८ रोजी लग्न झाले. लग्नानंतर पती व सासू-सासऱ्याने बौद्ध धर्म सोडून ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला.

No mother-in-law; want Rajarani's world! Bench's refusal to grant maintenance to wife in divorce | सासू-सासरे नको; हवा राजाराणीचा संसार; पत्नीला पोटगी देण्यास खंडपीठाचा नकार

सासू-सासरे नको; हवा राजाराणीचा संसार; पत्नीला पोटगी देण्यास खंडपीठाचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : सासू-सासरे सोबत नको म्हणणाऱ्या आणि पतीला केवळ राजा-राणीचा संसार करण्यासाठी बाध्य करू पाहणाऱ्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही चपराक बसली. कुटुंब न्यायालयानंतर उच्च न्यायालयाने तिला पोटगीसाठी अपात्र ठरविले. न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.

प्रकरणातील दाम्पत्य नागपूरचे असून, त्यांचे १८ एप्रिल २०१८ रोजी लग्न झाले. लग्नानंतर पती व सासू-सासऱ्याने बौद्ध धर्म सोडून ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला. पत्नी महानुभाव पंथाची अनुयायी आहे. तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही. त्यामुळे पती व सासू-सासरे छळ करीत होते. त्यांनी तिला घराबााहेर काढल्याने ती माहेरी निघून गेली, असा आरोप केला गेला होता; परंतु आरोप सिद्ध झाले नाहीत.

पत्नीने कुटुंब न्यायालयात दिलेल्या जबाबावरून, तिची पतीविरुद्ध तक्रार नाही, हे दिसून आले; तिला सासू-सासरे नको आहेत. तिला केवळ पतीसोबत राहायचे आहे, हे आढळले. २०१० मध्ये पत्नी माहेरी गेली होती. ती पतीसोबत परतली. छळ झाला असता, तर तिने सासरी येण्याचा निर्णय घेतला नसता, याकडे निर्णय देताना लक्ष वेधण्यात आले. पत्नी आठवड्यातून तीन दिवस महानुभावपंथीय मंदिरात जात होती. त्यावरून तिला मंदिरात जाण्याची मुभा होती, हे स्पष्ट झाले.

...म्हणून पोटगी नाही
nपत्नी कोणत्याही ठोस कारणांशिवाय पतीपासून वेगळी झाली आहे. पतीने तिला सासरी परत आणण्याचे प्रयत्न केले; पण तिने प्रतिसाद दिला नाही. पतीने स्वत:हून पत्नीची देखभाल करणे टाळले नाही. त्यामुळे तिला पोटगी दिली जाऊ शकत नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. 
nकुटुंब न्यायालयाने ९ मे २०१४ रोजी पत्नीची मासिक पाच हजार रुपये पोटगीची मागणी नामंजूर केली होती. त्यामुळे तिने न्यायालयात धाव घेतली. 

Web Title: No mother-in-law; want Rajarani's world! Bench's refusal to grant maintenance to wife in divorce