‘नो हेल्मेट... नो राईड... नो एक्सक्यूज’ हेल्मेट वापरासाठी पोलीस आणि डॉक्टरांची संयुक्त मोहीम

By सुमेध वाघमार | Updated: March 20, 2026 19:19 IST2026-03-20T19:18:18+5:302026-03-20T19:19:21+5:30

Nagpur : पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते या घोषवाक्याचे आणि मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. न्यूरोलॉजिकल सोसायटी आॅफ इंडियाचे कार्यकारिणी सदस्य आणि 'हेड इंज्युरी' उपक्रमाचे संयोजक, प्रसिद्ध न्यूरोसर्जन प्रा. डॉ. प्रमोद गिरी यांच्या संकल्पनेतून ही मोहीम साकारण्यात आलीे.

‘No Helmet... No Ride... No Excuses’ Joint Campaign by Police and Doctors for Helmet Use | ‘नो हेल्मेट... नो राईड... नो एक्सक्यूज’ हेल्मेट वापरासाठी पोलीस आणि डॉक्टरांची संयुक्त मोहीम

‘No Helmet... No Ride... No Excuses’ Joint Campaign by Police and Doctors for Helmet Use

नागपूर: दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यामुळे देशात दरवर्षी तब्बल ५० हजारांहून अधिक लोकांचा हकनाक बळी जातो. हे विदारक वास्तव बदलण्यासाठी आणि नागरिकांमध्ये हेल्मेटच्या वापराबाबत गांभीर्य निर्माण करण्यासाठी शुक्रवारी जागतिक मेंदू दुखापत जनजागृती दिनानिमित्त नागपूर पोलीस आणि न्यूरोलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया यांच्यातर्फे ‘नो हेल्मेट... नो राईड... नो एक्सक्यूज’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते या घोषवाक्याचे आणि मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. न्यूरोलॉजिकल सोसायटी आॅफ इंडियाचे कार्यकारिणी सदस्य आणि 'हेड इंज्युरी' उपक्रमाचे संयोजक, प्रसिद्ध न्यूरोसर्जन प्रा. डॉ. प्रमोद गिरी यांच्या संकल्पनेतून ही मोहीम साकारण्यात आलीे. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.

हेल्मेट 'जीवनरक्षक ढाल'

या प्रसंगी डॉ. प्रमोद गिरी म्हणाले, भारतात दरवर्षी ५० हजारांपेक्षा जास्त मृत्यू केवळ हेल्मेट न घातल्यामुळे होतात आणि यातील बहुतांश मृत्यू हे मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे होतात. दुचाकी अपघातात योग्य हेल्मेटचा वापर केल्यास मेंदूच्या दुखापतीचा आणि मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणावर टाळता येऊ शकतो. हेल्मेट ही केवळ डोक्यावर घालण्याची वस्तू नसून ती मृत्यूपासून वाचवणारी 'जीवनरक्षक ढाल' आहे. त्यामुळे हेल्मेटचा वापर हा पर्याय नसून ती एक सवय आणि सामाजिक जबाबदारी बनली पाहिजे.

नियमांची कडक अंमलबजावणी होणार

पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल म्हणाले, शहरातील रस्ते अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी न्यूरोलॉजिकल सोसायटी आॅफ इंडियाने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. हेल्मेट सक्तीच्या नियमांची अत्यंत कडक अंमलबजावणी केली जाईल. या जनजागृती मोहिमेला नागपूर पोलिसांचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.

वैद्यकीय क्षेत्राचा उत्स्फूर्त पाठिंबा

या जीवनदायी उपक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातूनही मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला डॉ. पवित्र पटनाईक, डॉ. शिवाजी देशमुख, डॉ. संजोग गजभिये आणि डॉ. रामानुज काबरा यांच्यासह अनेक नामवंत तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

Web Title : नागपुर पुलिस, डॉक्टरों का संयुक्त अभियान: हेलमेट नहीं, तो सवारी नहीं!

Web Summary : नागपुर पुलिस और डॉक्टरों ने सड़क दुर्घटनाओं को कम करने के लिए हेलमेट उपयोग को बढ़ावा देने के लिए एक अभियान शुरू किया। 'नो हेलमेट, नो राइड' पहल हेलमेट को जीवन रक्षक के रूप में जोर देती है और सख्त नियमों को लागू करती है। डॉक्टरों ने समर्थन का वादा किया।

Web Title : Nagpur Police, Doctors Unite: No Helmet, No Ride, No Excuse!

Web Summary : Nagpur police and doctors launched a campaign promoting helmet use to reduce road fatalities. The 'No Helmet, No Ride' initiative emphasizes helmets as life-saving and enforces strict rules. Doctors pledged support.