नागपूर : अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी कुठलाही शेतकरी पंचनाम्याविना राहणार नाही, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
दररोजचा पाऊस इतका आहे की शेतकरी शेतात जायलाच घाबरत आहेत. शेतात गेल्यावर त्यांच्या डोळ्यांत अश्रू येतात. पण शासनाने पंचनामे सुरू केले आहेत. नुकसानग्रस्तांना मदत देणे हेच सरकारचे प्रमुख काम आहे. जिल्हाधिकाऱ्यांना थेट निधी काढून देण्याचे अधिकार देण्यात आले असून, मदत तत्काळ पोहोचवली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
विरोधकांचे काम मागणी करणे आहे. पण आमचे सरकार नियमांनुसार मदत करेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती; मात्र ती दिली नाही. आज मात्र आमचे सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.
केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत ते म्हणाले की, पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या संकटात मदत केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांकडे आकडेवारी मांडली आहे. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मोठी मदत मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राहुल गांधींवर निशाणा साधताना बावनकुळे म्हणाले, “शेतकऱ्यांना आम्ही मदत केली नाही तर काय राहुल गांधी मदत करतील का? जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही पार पाडतो आहे.
नागपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात आपण स्वतः भेट देऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहोत, तेथील पंचनाम्यांची स्थितीतपासणार आहोत, असेही बावनकुळे म्हणाले.
Web Summary : Revenue Minister assures that all affected farmers will receive government assistance after assessments. Funds are available for immediate relief, and the government is actively assessing damages. He criticized previous administrations and expressed confidence in central government support. He also mentioned visiting affected areas.
Web Summary : राजस्व मंत्री ने आश्वासन दिया कि सभी प्रभावित किसानों को आकलन के बाद सरकारी सहायता मिलेगी। तत्काल राहत के लिए धन उपलब्ध है, और सरकार सक्रिय रूप से नुकसान का आकलन कर रही है। उन्होंने पिछली सरकारों की आलोचना की और केंद्र सरकार के समर्थन में विश्वास व्यक्त किया। उन्होंने प्रभावित क्षेत्रों का दौरा करने का भी उल्लेख किया।