कर्मचारीच नाहीत अन् बिल अव्वाच्यासव्वा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 12:43 AM2020-09-01T00:43:33+5:302020-09-01T00:45:00+5:30

कोविड-१९ चा सामना करण्यासाठी, रुग्णांना लवकर उपचार मिळावेत यासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली. मात्र, अनेक रुग्णालयात कर्मचाऱ्यांची वानवा आहे. बिल मात्र अव्वाच्यासव्वा आकारल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.

No employees and the bill high! | कर्मचारीच नाहीत अन् बिल अव्वाच्यासव्वा!

कर्मचारीच नाहीत अन् बिल अव्वाच्यासव्वा!

Next
ठळक मुद्देउपसमितीच्या अहवालातील तथ्य : सीसीसी, चाचणी केंद्रातील व्यवस्था उत्तम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ चा सामना करण्यासाठी, रुग्णांना लवकर उपचार मिळावेत यासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली. मात्र, अनेक रुग्णालयात कर्मचाऱ्यांची वानवा आहे. बिल मात्र अव्वाच्यासव्वा आकारल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.
मनपाने तयार केलेले कोविड केअर सेंटर आणि कोविड चाचणी केंद्रात मात्र उत्तम व्यवस्था असल्याचा अहवाल उपसमितीने दिला आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर नागपुरात असलेल्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी पदाधिकारी-प्रशासनाच्या चार समित्या तयार केल्या होत्या. या समितीने महापौरांना अहवाल सादर केला. सोमवारी याचा आढावा घेतला. बैठकीला महापौर संदीप जोशी यांच्यासह आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., सत्तापक्ष उपनेते वर्षा ठाकरे, नरेंद्र बोरकर, प्रतोद दिव्या धुरडे, शिवसेना गटनेते किशोर कुमेरिया, राकाँचे गटनेते दुनेश्वर पेठे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विधी समिती सभापती अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे उपस्थित होते. कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर, कोविड चाचणी केंद्र आणि मेडिकल, मेयो, एम्स येथील व्यवस्थेची पाहणी त्यासाठी तयार करण्यात आलेल्या उपसमितीने केली.
खासगी कोविड हॉस्पिटलसाठी तयार करण्यात आलेल्या समिती प्रमुख उपमहापौर मनीषा कोठे यांनी काही हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. अनामत रक्कम अधिक घेतली जाते. एका रुग्णालयात केवळ औषधाचे बिल २,३६,००० आणि उपचाराचे बिल १,९६,००० देण्यात आले. त्यामुळे खासगी रुग्णालयांवर मनपाने आळा घालावा, अशी सूचना अहवालातून मांडली. कोविड केअर सेंटरचा अहवाल उपसमितीचे प्रमुख विजय झलके यांनी मांडला. आमदार निवास, पाचपावली आणि व्हीएनआयटी कोविड केअर सेंटरला भेट दिली. येथील व्यवस्था उत्तम असल्याचे सांगितले. शासकीय रुग्णालयातील व्यवस्थेचा अहवाल उपसमितीचे सदस्य सुनील अग्रवाल यांनी मांडला. बेड उपलब्ध असतानाही अपुºया कर्मचारी वर्गामुळे केवळ ५० टक्के बेडचा उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड चाचणी केंद्राचा अहवाल उपसमितीच्या प्रमुख सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे यांनी मांडला. ३४ पैकी ३० चाचणी केंद्राला उपसमितीने भेट दिली असून, सर्व केंद्रांवर व्यवस्था उत्तम आहे. आमदार प्रवीण दटके यांनी यावेळी गंगाबाई घाट येथील वास्तव मांडले. तेथे कोविड रुग्ण दहन करण्याची संख्या अधिक झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अन्य मृत व्यक्तीचे दहन करताना बºयाच अडचणी येत आहेत. उपसमितीने केलेल्या सूचनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले.

Web Title: No employees and the bill high!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.