शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

रेल्वे मंत्रालयाबाबत नितीन गडकरींचं मौन, म्हणाले मंत्रिपदाचा निर्णय पंतप्रधानच घेतील  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2017 10:25 PM

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात विविध चर्चा रंगल्या असून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वेखात्याची जबाबदारी देण्याची शक्यता असल्याचे कयास राजकीय वर्तुळात वर्तवले जात आहेत. मात्र कोणत्या खात्याचा मंत्री कोण होणार व कुणाला कुठली जबाबदारी द्यायची, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ठरवतील, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले अहे.

नागपूर, दि. 2-  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात विविध चर्चा रंगल्या असून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वेखात्याची जबाबदारी देण्याची शक्यता असल्याचे कयास राजकीय वर्तुळात वर्तवले जात आहेत. मात्र कोणत्या खात्याचा मंत्री कोण होणार व कुणाला कुठली जबाबदारी द्यायची, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ठरवतील, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले अहे. नितीन गडकरी शनिवारी विशेष विमानाने नागपुरात आले. यानंतर त्यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांनी गडकरी यांना मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात विचारणा केली. मात्र गडकरी यांनी यावर ठोस बोलण्यास नकार दिला. मंत्री कोण होणार ते पंतप्रधानच ठरविणार इतकेच केवळ ते म्हणाले. कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतादरम्यान, नितीन गडकरी यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारात आणखी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता लक्षात घेता, भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. गडकरी यांनी भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्रालयाची धुरा सक्षमपणे सांभाळली असून या मंत्रालयाच्या कामांना वेग दिला आहे. त्यामुळे नवीन जबाबदारी मिळाल्यावरदेखील त्यांच्या कामाचा धडाका कायमच राहील, अशी भावना कार्यकर्ते व पदाधिका-यांनी बोलून दाखविली. नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचीच चर्चा दिसून येत आहे.

टॅग्स :BJPभाजपा