शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक याचिका खारीज करण्याची नितीन गडकरी यांची विनंती अमान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 11:16 IST

Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८६(१) अंतर्गत दाखल केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी शुक्रवारी गुणवत्ताहीन ठरवून फेटाळला.

ठळक मुद्दे आक्षेप अर्ज फेटाळून लावला

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : मतदार मो. नफिस खान यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका खारीज करण्यात यावी अशा विनंतीसह केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८६(१) अंतर्गत दाखल केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी शुक्रवारी गुणवत्ताहीन ठरवून फेटाळला.

मो. नफिस खान यांनी निवडणूक याचिकेसोबतच्या प्रतिज्ञापत्रातील ४५-ए क्रमांकाच्या पानाची प्रत पुरवली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८१(३) मधील तरतुदीचे उल्लंघन झाले आहे. याशिवाय ही निवडणूक याचिका कलम ८३(२) मधील तरतुदीचेही पालन करीत नाही. करिता ही याचिका कलम ८६(१) अंतर्गत खारीज करण्यात यावी असे गडकरी यांचे म्हणणे होते. मो. नफिस खान यांनी या आक्षेपांवर उत्तर सादर करून गडकरी यांना निवडणूक याचिकेची प्रत पुरवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, गडकरी यांनी दाखवलेली त्रुटी दूर करण्यायोग्य असून त्यांना ४५-ए क्रमांकाचे पान पुरवले जाईल असे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाला या मुद्यांमध्ये तथ्य आढळून आल्यामुळे निवडणूक याचिका खारीज करण्यास नकार देण्यात आला. तसेच, ४५-ए क्रमांकाच्या पानाची प्रत गडकरी यांना १० दिवसात पुरवण्यात यावी असे निर्देश खान यांना देण्यात आले. गडकरी यांच्यातर्फे वरिष्ठ वकील ऍड. सुनील मनोहर व अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण तर, याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीधर पुरोहित यांनी कामकाज पाहिले.

असे आहे याचिकाकर्त्याचे म्हणणे

नितीन गडकरी मे-२०१९ मध्ये लोकसभेच्या नागपूर मतदार संघातून विजयी झाले आहेत. दरम्यान, त्यांनी या निवडणुकीत झालेल्या खर्चाचा योग्य हिशेब सादर केला नाही. निवडणुकीच्या नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही. त्यांनी खरे उत्पन्न लपवून ठेवले. उत्पन्नाचा स्रोत शेती असल्याचे नमूद केले. तसेच, त्यांनी निवडणूक कायद्यातील विविध तरतुदी व नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द करून नागपूर मतदार संघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे मो. नफिस खान यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय