नीलेश भरणे यांच्याकडे ‘क्राईम ब्रँच’ची जबाबदारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:57 PM2019-03-06T23:57:02+5:302019-03-07T00:14:53+5:30

वाहतूक शाखेचे डीसीपी नीलेश भरणे यांना गुन्हे शाखेची (क्राईम ब्रँच) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. बी.के. उपाध्याय यांनी बुधवारी रात्री यासंबंधीचे आदेश जरी केले आहेत. भरणे यांच्या नियुक्तीसोबतच बुधवारी गुन्हे शाखेतून रवींद्र कदम यांना कार्यमुक्त करण्यात आले. कदम यांची गेल्या आठवड्यात पुणे येथे बदली झाली आहे.

Nilesh Bharne has the responsibility of 'Crime Branch' | नीलेश भरणे यांच्याकडे ‘क्राईम ब्रँच’ची जबाबदारी 

नीलेश भरणे यांच्याकडे ‘क्राईम ब्रँच’ची जबाबदारी 

googlenewsNext
ठळक मुद्देराजमाने यांना वाहतूक शाखेचा अतिरिक्त कारभार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहतूक शाखेचे डीसीपी नीलेश भरणे यांना गुन्हे शाखेची (क्राईम ब्रँच) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. बी.के. उपाध्याय यांनी बुधवारी रात्री यासंबंधीचे आदेश जरी केले आहेत. भरणे यांच्या नियुक्तीसोबतच बुधवारी गुन्हे शाखेतून रवींद्र कदम यांना कार्यमुक्त करण्यात आले. कदम यांची गेल्या आठवड्यात पुणे येथे बदली झाली आहे.
भरणे हे भारतीय पोलीस सेवेच्या २००५ च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते मूळचे उत्तराखंड कॅडरचे अधिकारी आहे. त्यांची प्रतिनियुक्तीवर नागपूरला बदली करण्यात आली आहे. त्यांना १ मे २०१७ रोजी विशेष शाखेच नियुक्ती देण्यात आली होती. येथे तैनातीदरम्यान २४ तासात पासपोर्ट व्हेरिफिकेशनची तपासणी पूर्ण करण्याचा रेकॉर्ड बनवण्यात आला होता. त्यांच्या या कार्याचे देशभरात कौतुक करण्यात आले होते. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांना झोन चारमध्ये तैनात करण्यात आले. गुन्ह्यांच्या बाबतीत झोन चार अतिशय संवेदनशील आहे. भरणे यांनी येथील अवैध धंदे आणि गुन्हेगारांच्या विरुद्ध व्यापक कारवाई केली. त्यांच्या कार्यशैलीमुळे झोन चारच्या गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली होती. गेल्या २१ फेब्रुवारी रोजी त्याची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली. येथे सुद्धा आठवडाभरातच त्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक उपाय केले. मंगळवारी जामठा येथे झालेल्या भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट सामन्यादरम्यान पहिल्यांदाच वर्धा रोडवर वाहतूक जाम झाली नाही. नागरिकांना त्रास सहन करावा लागला नाही.
भरणे हे मूळचे नागपूरचेच असल्याने येथील गुन्हेगरी रोखण्यास ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. निवडणुकांदरम्यान गुन्हेगारी तत्त्व सक्रिय होतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे पोलिसांसाठीही आव्हानात्मक असते. पोलिसांनी निवडणुकांदरम्यान गडबड करू शकणाऱ्या गुन्हेगारांची एक यादी तयार केली आहे. त्याची लवकरच धरपकड होणार आहे. अनेक वर्षानंतर गुन्हे शाखेमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून स्थानिक अधिकाऱ्याला नियुक्त करण्यात आले आहे. भरणे यांच्या बदलीनंतर डीसीपी मुख्यालय गजानन राजमाने यांच्याकडे वाहतूक शाखेचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

नंदनवार बनले नवे एसीपी 
 त्याचप्रकारे विशेष शाखेचे एसीबी सुधीर नंदनवार यांनाही गुन्हे शाखेत पाठवण्यात आले आहे. नंदनवार सुद्धा शहरातील अनुभवी अधिकारी आहेत. त्यांनी तहसील, नंदनवन, बजाजनगरचे ठाणेदार म्हणून कार्य केले आहे. एसीपी पदोन्नतीवर त्यांना बजाजनगर येथून विशेष शाखेत नियुक्त करण्यात आले आहे.

Web Title: Nilesh Bharne has the responsibility of 'Crime Branch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.