शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

बालगृह बंद करण्यास एनजीओचा विरोध

By admin | Updated: November 6, 2014 02:44 IST

काटोल मार्गावरील मुलींचे बालगृह बंद करण्याच्या विरोधात दाखल जनहित याचिका उच्च न्यायालयाचे ...

नागपूर : काटोल मार्गावरील मुलींचे बालगृह बंद करण्याच्या विरोधात दाखल जनहित याचिका उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई आणि न्या. व्ही. एम. देशपांडे यांच्या खंडपीठाने तीन आठवड्यानंतर सुनावणीस ठेवली. ही याचिका भारतीय स्त्री शक्तीच्या हर्षदा पुरेकर यांनी दाखल केली आहे. न्यायालयाने तत्त्व प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मीरा खडक्कार यांना मध्यस्ती करण्यास आणि मूळ याचिकेच्या कार्यवाहीत सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. प्रतिवादी महिला व बालविकास विभागाचे सचिव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना बाल गृहातील मुली अन्यत्र हलविण्यास मज्जाव करण्यात यावा, विविध ठिकाणी स्थानांतरित करण्यात आलेल्या मुलींना परत आणण्यात यावे, काटोल मार्गावरील बालगृह बंद करण्यासही मज्जाव करण्यात यावा, असे निर्देश या याचिकेद्वारे मागण्यात आले आहेत. या संस्थेला अर्थिक साहाय्य म्हणून जिल्हा अधिकाऱ्यांनी निधी वितरित करावा, अशी प्रार्थनाही याचिकेद्वारे करण्यात आली. येथील मुली ८ ते १३ वयोगटातील आहेत. कोणत्याही पूर्वसूचनेविना बालगृहाकडून श्रद्धानंद अनाथालयाला असे सूचित करण्यात आले की, उपासमारीची शक्यता असल्याने आम्ही काही मुली आपणाकडे स्थानांतरित करीत आहोत. खडक्कार आणि अन्य दोन कार्यकर्त्यांनी या बालगृहाला भेट दिली. त्यांना या ठिकाणी काही अनियमितता आढळून आल्या. त्या त्यांना न्यायालयात सादर करावयाच्या आहेत. न्यायालयात याचिकाकर्त्या हर्षदा पुरेकर यांच्यावतीने अ‍ॅड. पद्मा चांदेकर, मध्यस्ताच्यावतीने अ‍ॅड. अंजली जोशी तर सरकारच्यावतीने मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)