नवनियुक्त अतिरिक्त न्यायमूर्ती पानसरे व न्या. मोरे यांनी घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 09:44 PM2021-10-21T21:44:11+5:302021-10-21T21:44:40+5:30

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त अतिरिक्त न्यायमूर्ती अनिल लक्ष्मण पानसरे व संदीपकुमार चंद्रभान मोरे यांनी गुरुवारी पदाची शपथ घेतली.

Newly appointed Additional Justice Pansare and Justice. More took the oath | नवनियुक्त अतिरिक्त न्यायमूर्ती पानसरे व न्या. मोरे यांनी घेतली शपथ

नवनियुक्त अतिरिक्त न्यायमूर्ती पानसरे व न्या. मोरे यांनी घेतली शपथ

googlenewsNext

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त अतिरिक्त न्यायमूर्ती अनिल लक्ष्मण पानसरे व संदीपकुमार चंद्रभान मोरे यांनी गुरुवारी पदाची शपथ घेतली. हा समारंभ मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या सेंट्रल कोर्ट हॉलमध्ये सकाळी १० वाजता पार पडला.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी या दोन्ही अतिरिक्त न्यायमूर्तींना शपथ दिली. ऑनलाइन प्रसारणामुळे प्रत्येक इच्छुकांना समारंभ पाहता आला. दोन्ही अतिरिक्त न्यायमूर्ती आधी न्यायिक अधिकारी होते. दरम्यान, त्यांनी विविध न्यायिक पदांवर यशस्वीपणे कार्य केले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने गेल्या २९ सप्टेंबर रोजी त्यांची अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली होती. ती शिफारस मंजूर करून यासंदर्भात १४ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. या अतिरिक्त न्यायमूर्तींच्या नियुक्तीमुळे उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची एकूण संख्या ६० झाली आहे. या न्यायालयाला न्यायमूर्तींची ९४ पदे मंजूर आहेत. आता ३४ पदे रिक्त आहेत.

Web Title: Newly appointed Additional Justice Pansare and Justice. More took the oath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.