शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
2
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
3
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
4
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
5
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
6
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
7
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
8
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
9
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
10
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
11
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
15
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
16
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
17
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
18
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
19
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
20
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियातील मेडिकल कॉलेजसाठी नव्याने प्रस्ताव

By admin | Updated: May 27, 2014 01:48 IST

येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाने पुरेशी जागा उपलब्ध करून दिली नसल्याच्या कारणावरून वैद्यकीय परिषदेने हा प्रस्ताव नामंजूर केला आहे.

गोंदिया : येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाने पुरेशी जागा उपलब्ध करून दिली नसल्याच्या कारणावरून वैद्यकीय परिषदेने हा प्रस्ताव नामंजूर केला आहे. मात्र यासाठी आता शासनाने १५ हेक्टर जागा उपलब्ध करून दिल्याने राज्य शासनाच्या वतीने याबाबतचा पुनर्प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अनेक वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरू आहेत. पुनर्प्रस्ताव मंजूर होण्यासोबतच यावर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरूही होईल, असा विश्वास आमदार गोपालदास अग्रवाल यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केला आहे. राज्य शासनाने महाराष्ट्रात सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली होती. त्यापैकी गोंदिया, बारामती व चंद्रपूर या तीन शासकीय महाविद्यालयांसाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिली. गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सर्व मूलभूत सोयी या ठिकाणी उपलब्ध असल्याने महाविद्यालयाचा अग्रिम प्रस्ताव भारतीय वैद्यकीय परिषदेकडे (मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया) सादर करण्यात आला होता. त्यात राज्य शासनाच्या वतीने आवश्यक जमीन वनकायद्यातून मुक्त करून उपलब्ध करुन देण्यात येईल, असे हमीपत्र देण्यात आले होते. मात्र, या हमीपत्राला परिषदेने मंजुरी दिली नाही व जागा उपलब्ध करून प्रस्ताव परत पाठविण्याचे निर्देश देऊन प्रस्ताव नामंजूर केला होता. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार किंवा नाही, याबद्दल संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. त्यातच आता येथे शासकीय महाविद्यालय सुरू होणारच नाही, अशी अफवा जिल्ह्यात पसरली होती. शासनाने कुडवा ग्रामपंचायतींतर्गत १५ हेक्टर वनभूमी वनकायद्यातून मुक्त करून वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्याने राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांमार्फत दि.२१/५/२०१४ रोजी प्रस्ताव परत मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. जागेचा प्रश्न सुटल्याने आता गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला निश्चितच परवानगी मिळेल, असे आ.अग्रवाल यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)