शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
2
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
3
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
4
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
5
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
6
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
9
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
10
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
11
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
12
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
19
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
20
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नव्या सरकारने जीएसटी लागू करावे

By admin | Updated: June 11, 2014 01:09 IST

कर भरणा प्रक्रियेतील त्यातील अडचणी दूर करण्यात याव्या. टॅक्स प्रणालीत सुधारणा करून संपुआ सरकारद्वारे लावण्यात आलेला माल व सेवाकर (जीटीएस) आणि प्रत्यक्ष कर कोड(डीटीसी)च्या स्वरूपात बदल करावा.

करात सुलभता आणावी : व्हीटीएची मागणी
नागपूर : कर भरणा प्रक्रियेतील त्यातील अडचणी दूर करण्यात याव्या. टॅक्स प्रणालीत सुधारणा करून संपुआ सरकारद्वारे लावण्यात आलेला माल व सेवाकर (जीटीएस) आणि प्रत्यक्ष कर कोड(डीटीसी)च्या स्वरूपात बदल करावा. मनमानी व अटकेसारख्या तरतुदीत सुधारणा करण्यात येऊन यास सोपे करावे, अशी मागणी विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनचे अध्यक्ष जे.पी. शर्मा यांनी केली आहे.

शर्मा म्हणाले, नव्या सरकारने देशातील टॅक्सपेअर्सची संख्या वाढविण्यासाठी डीटीसीनुसार सर्व वर्गातील लोकांसाठी टॅक्समध्ये दोन लाखांपर्यंतची सूट देण्यात यावी. २ ते १० लाखापर्यंत १० टक्के, १० ते २० लाखांपर्यंतच्या २० टक्के , २० लाख ते ५ कोटी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ३० टक्के स्लॅब देण्यात यावी. पाच कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी ३५ टक्के स्लॅब तयार करण्यात यावी. यामुळे मध्यम वर्ग व लहान व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल. डी व ई श्रेणीचे १० कोटी नागरिक टॅक्सचा भरणा करीत नाहीत.

सरकारद्वारे १० टक्के स्लॅबला २ लाख ते १० लाख रुपये उत्पन्न गटात आणल्यास १० लाखापर्यंत उत्पन्न असणारे सुमारे सात ते आठ लाख लोक कराचा भरणा करतील. १० ते २० टक्के स्लॅब लावल्याने एक लाख कोटीचा कर मिळणार नाही. परंतु चौथ्या स्लॅबमधून मिळणारा कर यातील तूट भरून काढेल. १० ते २० लाखांची नवीन स्लॅब तयार केल्यास येणाऱ्या दोन-तीन वर्षांत तीन ते चार कोटी नवे करदाते समाविष्ट होतील. यातून १ ते १.१५ लाख कोटींचा कर सरकारला मिळेल. देशात सर्वत्र पेट्रोल, डिझेल व सीएनजीच्या किमती समान करण्यात याव्यात. यामुळे तस्करीवर आळा बसेल. पेट्रोलियम पदार्थांवर राज्य शासनाच्या वतीने १५ ते २७ टक्क्यापर्यंत स्प्रिंट टॅक्स लावण्यात येत आहे. त्याला एकसमान करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)