शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नवीन सीएंनी अद्ययावत राहावे

By admin | Updated: February 12, 2016 03:26 IST

ज्ञान आणि कामाच्या संदर्भात नवीन सीएंनी स्वत:ला निरंतर अद्ययावत ठेवण्याची गरज आहे. याशिवाय संस्थेतील वरिष्ठ सहकाऱ्यांच्या अनुभवापासून शिकण्यासाठी त्यांनी तत्पर राहावे,

नितीन खारा यांचे आवाहन : सीएंसाठी माहितीपर कार्यक्रमनागपूर : ज्ञान आणि कामाच्या संदर्भात नवीन सीएंनी स्वत:ला निरंतर अद्ययावत ठेवण्याची गरज आहे. याशिवाय संस्थेतील वरिष्ठ सहकाऱ्यांच्या अनुभवापासून शिकण्यासाठी त्यांनी तत्पर राहावे, असे आवाहन कॉन्फिडेन्स समूहाचे चेअरमन नितीन खारा यांनी येथे केले. कॅम्पस ओरिएन्टेड कार्यक्रमाचे आयोजन द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाच्या इंडस्ट्रीमध्ये असलेल्या सदस्यांच्या समितीच्या वतीने आणि आयसीएआयच्या नागपूर सीए संस्थेच्या सहकार्याने नुकतेच करण्यात आले. चार्टर्ड अकाऊंटंटची निष्ठा, समर्पण आणि जबाबदारीमुळे कोणत्याही कंपनीचा विकास वेगाने होऊ शकतो, असे खारा यांनी स्पष्ट केले.यावेळी नागपूर सीए संस्थेच्या अध्यक्षा कीर्ती अग्रवाल, आरसीएम जुल्फेश शाह, अभय अग्रवाल, एसएमएस एन्व्होकेअर लि.चे हेमंत लोढा, सुप्रिया पॅकेजिंगचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश राठी आणि गिरीश देवधर यांच्यासह संस्थेचे माजी अध्यक्ष स्वप्नील अग्रवाल, सचिव संदीप जोतवानी उपस्थित होते. कीर्ती अग्रवाल म्हणाल्या, सीए कोर्सचे प्रशिक्षण आणि तांत्रिक ज्ञान युवा सीएंना अधिक सक्षम बनविते. नवीन सीएंनी कार्यरत असलेल्या कंपनीप्रति एकनिष्ठ असावे. व्यवसाय सांभाळायचा की वैयक्तिक विकास साधायचा, असे पर्याय त्यांच्यासमोर आहेत. आर्थिक विकासात नवीन सदस्यांनी नेहमीच तत्पर आणि अद्ययावत राहावे. जुल्फेश शाह म्हणाले, नवीन सदस्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात प्रचंड संधी असून, त्यांनी यशासाठी एका कंपनीत जास्त काळ काम करावे आणि अनुभव प्राप्त करावा. प्रारंभी स्वप्नील अग्रवाल यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. संदीप जोतवानी यांनी आभार मानले. यावेळी स्वप्नील घाटे, उमंग अग्रवाल, सुरेन दुरगकर, किरीट कल्याणी, संजय अग्रवाल, साकेट बागडिया, जितेन सागलानी आणि १२० पेक्षा जास्त युवा सीए उपस्थित होते.(प्रतिनिधी)