शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

 गाड्यांमधून स्फोटक फटाक्यांची वाहतूक संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष : बेफिकरीमुळे घडू शकतो अनर्थ

By नरेश डोंगरे | Updated: October 7, 2025 23:08 IST

Nagpur News: स्फोटक आणि ज्वलनशिल चिजवस्तूंच्या वाहतुकीवर प्रतिबंध असतानादेखिल रेल्वे गाड्या, बसेस आणि अन्य वाहनांमधून सर्रास फटाक्यांची वाहतूक होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. विशेष म्हणजे, कारवाईचा अधिकार असणाऱ्या मंडळीकडून या धोकादायक प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने अनर्थ होण्याची भिती व्यक्त होत आहे.

- नरेश डोंगरेनागपूर - स्फोटक आणि ज्वलनशिल चिजवस्तूंच्या वाहतुकीवर प्रतिबंध असतानादेखिल रेल्वे गाड्या, बसेस आणि अन्य वाहनांमधून सर्रास फटाक्यांची वाहतूक होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. विशेष म्हणजे, कारवाईचा अधिकार असणाऱ्या मंडळीकडून या धोकादायक प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने अनर्थ होण्याची भिती व्यक्त होत आहे.

रेल्वे गाड्या, बसेस किंवा दुसऱ्या कोणत्याही सार्वजनिक परिवहनाच्या माध्यमातून स्फोटक आणि ज्वलनशिल चिजवस्तूंची वाहतूक करण्यास सक्त मनाई आहे. रेल्वे गाड्यांमध्ये बारूद, फटाके किंवा कोणत्याच प्रकारची स्फोटके, सिलिंडर, पेट्रोल अथवा रॉकेल तसेच स्टोव्हची वाहतूक करणारावर रेल्वे अॅक्टच्या कलम १६४ अन्वये कडक कारवाई केली जाते. मात्र, असे असूनही रेल्वे गाड्यांमध्ये अनेक जण लपून छपून स्फोटकांची, फटाक्यांची तसेच प्रतिबंधित चिजवस्तूंची वाहतूक करतात. त्यांच्या या धोकादायक कृतीमुळे रेल्वे गाड्यांमध्ये आग लागून स्फोट घडल्याच्याही घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या जानमालाची हानी झाली आहे. मात्र, तरीदेखिल अनेक समाजकंटक तसेच बेजबाबदार मंडळी गाड्यांमधून लपून छपून अशा धोकादायक पदार्थांची, चिजवस्तूंची वाहतूक करतात. फेस्टीव्ह सिजनमध्ये हे प्रकार वाढतात.

दिवाळीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात फटाके फोडून आतिषबाजी केली जात असल्याने प्रदुषण वाढते. त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे सामाजिक संस्था, संघटना फटाके न फोडता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करतात. घरची जाणकार मंडळीही फटाक्यास मनाई करतात. मात्र, कितीही मनाई केली किंवा आवाहन केले तरी दरवर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके उडवले जातात. त्यामुळे अनेक ठिकाणी आगी लागतात आणि अनेकांना भाजल्यामुळे दुखापतही होते. आता दिवाळी तोंडावर आहे. त्यामुळे अनेक फटाके विक्रेते मोठ्या शहरातून फटाके विकत घेऊन आपल्या गावात नेऊन विकतात. ही मंडळी फटाक्यांची वाहतूक करण्यासाठी चक्क रेल्वे गाड्या, बस, ट्रॅव्हल्सचा बेमालूमपणे वापर करीत आहे.

पिशव्या आणि बॅगमध्ये फटाकेछोट्या-मोठ्या पिशव्या आणि बॅगमधून फटाक्यांची वाहतुक केली जाते. मोठ्या शहरातील रेल्वे स्थानकावर पकडले जाण्याचा धोका असल्याने ही मंडळी छोट्या, आडवळणाच्या ठिकाणी उतरतात आणि मागच्या भागाने निघून जातात. बस आणि ट्रॅव्हल्ससह ऑटो तसेच दुसऱ्या काही वाहनांचाही फटाक्याच्या वाहतुकीसाठी वापर केला जात आहे. संबंधित मंडळीचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने एखादवेळी मोठा धोका होण्याची भिती व्यक्त होत आहे.

या प्रकाराची आम्ही गंभीर दखल घेत आहोत. कोणत्याही ज्वलनशिल अथवा स्फोटक पदार्थांची तस्करी, वाहतूक करणारांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले असून, कारवाईसाठी विशेष पथके कामी लावण्यात आली आहेत.-दीपचंद्र आर्यविभागीय सुरक्षा आयुक्त, दपूम रेल्वे नागपूर.

English
हिंदी सारांश
Web Title : Negligence in Explosive Fireworks Transport: Disaster Looms Due to Carelessness

Web Summary : Explosive fireworks are being transported illegally via trains and buses, raising safety concerns. Authorities' negligence increases the risk of accidents. Diwali intensifies this dangerous trend, demanding strict action to prevent potential disasters and ensure public safety. Special squads are deployed for checks.
टॅग्स :fire crackerफटाकेrailwayरेल्वेnagpurनागपूर