शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

चीनसोबत संबंध सुधारणे गरजेचे

By admin | Updated: February 8, 2015 01:18 IST

भारत-चीन संबंधात अधिक सुधारणा झाल्यास संपूर्ण जगात दोन्ही देश एक नवीन शक्ती म्हणून उदयास येतील, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी व्यक्त केले.

राम माधव यांचे मत : दोन्ही देशांना होणार फायदानागपूर : भारत-चीन संबंधात अधिक सुधारणा झाल्यास संपूर्ण जगात दोन्ही देश एक नवीन शक्ती म्हणून उदयास येतील, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी व्यक्त केले.आर.एस. मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयात शनिवारी आयोजित ‘भारताचे शेजारी राष्ट्र : शत्रू की मित्र’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र जोशी व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या नायर उपस्थित होत्या.शेजारी कोण असावे हे जरी हाती नसले तरी त्यांच्या सोबत चांगले संबंध प्रस्थापित करणे हे प्रत्येक देशासाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेजारी राष्ट्रांना सोबत घेऊन व त्यांना बरोबरीचे स्थान देऊन पावले उचलणे अपेक्षित आहे. मोदी यांनी पाक,श्रीलंका,चीनसोबत अधिक चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत, असे राम माधव म्हणाले. मोदी यांचा अमेरिका दौरा, ओबामा यांची भारत भेट याचे दाखले देत राम माधव यांनी विदेश धोरण कसे असावे याबाबत भाष्य केले. कोणत्या देशात कोणत्या विचाराचे सरकार आहे हे पाहण्यापेक्षा देशहित कशात आहे हे पाहून विदेश धोरण निश्चित करावे, असे ते म्हणाले. श्रीलंका,पाक, बांगला देश या शेजारी राष्ट्रांविषयी विस्ताराने न बोलता त्यांनी चीनबाबत मात्र विस्ताराने भाष्य केले. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशापासून फक्त शेजारी राष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला धोका आहे हे सांगताना राम माधव यांनी ओबामांनी भारतात येण्यापूर्वी पाकिस्तानला दिलेल्या तंबीचे उदाहरण दिले. पाकसोबत संबंध सुधारायचे असेल तर त्यासाठी इतर राष्ट्रांचीही मदत घ्यावी लागेल, याकडे लक्ष वेधले. चीन विषयी बोलताना ते म्हणाले की, या देशासोबत संबंध सुधारताना त्यांची रणनीती काय आहे हे प्रथम समजून घ्यावे लागेल व त्यानंतरच पुढचे पाऊल टाकावे लागेल. तिबेटवर कब्जा केल्यानंतर चीन भारताचा शेजारी झाला. मात्र १९६२ मध्ये त्याने भारतावर हल्ला केल्याने दोन्ही देशात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न झाले पण ते पुरेसे नाही. आता त्यासाठी नव्याने पावले उचलावे लागतील. सध्या भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांची सूत्रे नवीन नेतृत्वाच्या हाती असून त्यांची दृष्टी वेगळी आहे. त्याचा फायदा दोन्ही देशातील संबंध अधिक मजबूत होण्यासाठी होईल. असे झाले तर दोन्ही देश जगात शक्तिशाली देश म्हणून उदयास येईल, असे राम माधव म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंजुश्री सरदेशपांडे यांनी केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत मा.गो. वैद्य, आमदार अनिल सोले, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांच्यासह शहरातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)विदेश धोरणाविषयीलोकजागृती व्हावीविदेशी धोरण हे दिल्लीत बसणाऱ्या मोजक्याच लोकांची मक्तेदारी आहे असा समज झाला आहे. सर्वसामान्य जनता यापासून दूरच राहते. भारतात सध्या हीच स्थिती असून याचा फटका यापूर्वी देशाने सहन केला आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. सामान्य जनतेतही या विषयी जागृती आणि आवड निर्माण व्हावी, असे राम माधव म्हणाले.