शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावासाठी कायद्यापेक्षा कृतीची गरज

By admin | Updated: May 7, 2017 02:29 IST

शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून सरकारतर्फे हमीभाव जाहीर केला जातो.

अनिल देशमुख : सरकार जबाबदारी झटकतेय लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून सरकारतर्फे हमीभाव जाहीर केला जातो. जाहीर करण्यात आलेल्या हमीभावानुसार खरेदी करणे ही सरकारची जबाबदारी असते. परंतु गेल्या तीन वर्षापासून सोयाबीन, तूर, कापूस, गहू, चणासोबतच इतर शेतमालाची खरेदी ही हमीभावापेक्षा कमी किमतीमध्येच होत आहे. आता राज्य सरकार हमीभावाने खरेदी होण्यासाठी कायदा करण्याची घोषणा करीत आहे. हमीभावाने शेतकऱ्यांचा माल खरेदी होण्यासाठी कायदाची नाही तर कृतीची गरज आहे, अशी टीका माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षापासून सततच्या नापिकीने शेतकरी पुरता हैरणा झाला आहे. असे असताना शासनाकडून एकाही रुपयाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली नाही. यावर्षी चांगले उत्पादन झाल्याने शेतकरी आनंदात होता. परंतु त्याचा माल बाजारात येताच भाव पडले. यातच नोटाबंदीच्या निर्णयानंतर बाजार समितीच्या व्यवहारावर परिणाम झाला आणि शेतमालाचे भाव पडले. दोन वर्षापासून तुरीचे उत्पादन कमी झाल्याने यावर्षी सरकारने शेतकऱ्यांना तुरीची लागवड करण्याचे आवाहन करीत तुरी हमी भावाने खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीची पेरणी करावी यासाठी तुरीचे बियाणेसुध्दा दिले होते. सुरुवातीला शासनाने तूर खरेदी करण्यास नकार दिला होता. यानंतर विरोधक आक्रमक झाल्यावर तूर खरेदी सुरू केली. परंतु कधी बारदाना नाही तर कधी जागा नाही यासह विविध कारणे देऊन तूर खरेदी संथ गतीने केली आणि आता तर ती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आधारभूत किमतीमध्ये शेतमाल खरेदी करण्याची जबाबदारी शासनाची असताना कायदा करू असे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.