नागपूर जिल्ह्यातील सावनेरनजीक अपघात : पिता-पुत्राचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:23 IST2019-04-02T00:22:28+5:302019-04-02T00:23:11+5:30
सावनेरजवळील भागिमाहरी बस थांब्याजवळ एका आयसर मालवाहू गाडीने दुचाकीवर स्वार असलेल्या पिता-पुत्राला धडक दिली. यात सुनील गजानन रामापुरे (४५) व मुलगा शर्म$न सुनील रामापुरे (१४) रा.भागिमाहरी यांचा मृत्यू झाला.

नागपूर जिल्ह्यातील सावनेरनजीक अपघात : पिता-पुत्राचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (सावनेर) : सावनेरजवळील भागिमाहरी बस थांब्याजवळ एका आयसर मालवाहू गाडीने दुचाकीवर स्वार असलेल्या पिता-पुत्राला धडक दिली. यात सुनील गजानन रामापुरे (४५) व मुलगा शर्म$न सुनील रामापुरे (१४) रा.भागिमाहरी यांचा मृत्यू झाला.
सुनील रामापुरे यांचा मोठा मुलगा शर्मन हा नांदागोमुख येथे श्रीराम विद्यालयामध्ये शिकत होता. त्याला बस स्थानकावर सोडून देण्याकरिता सुनील हे एम. एच.३१ एन ६८८१ या दुचाकीने जात असताना नागपूरकडून पांढुर्ण्याच्या दिशेने जात असलेल्या आयशर मालवाहक गाडीने दुचाकीला धडक दिली. सुनील रामापुरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या शर्मन याचा नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाला. मृत सुनील रामापुरे हे एका खासगी कंपनीत कामगार होते.