तुमची सटकत कशी नाही? सटकली पाहिजे…; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 08:24 IST2022-12-30T08:23:56+5:302022-12-30T08:24:57+5:30

विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अजित पवार यांनी हल्लाबोल केला.

ncp leader ajit pawar criticized shinde fadnavis govt in maharashtra winter session 2022 | तुमची सटकत कशी नाही? सटकली पाहिजे…; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

तुमची सटकत कशी नाही? सटकली पाहिजे…; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्क   

नागपूर: महापुरुषांचा अवमान होत असताना तुमची सटकत कशी नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला आणि तुमची सटकली पाहिजे, असा सल्लाही दिला. 

विधानसभेत गुरुवारी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना पवार यांनी हल्लाबोल केला.  संवैधानिक पदावर बसलेले लोक राष्ट्रपुरुषांचा अपमान करतात. अशा लोकांना परत पाठवायला हवे. त्यांची हकालपट्टी करायला हवी. अशा लोकांना जेलमध्ये टाका, त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडू द्या, अशा शब्दात पवार यांनी संताप व्यक्त केला.  

मुख्यमंत्र्यांचे पेन जप्त करा 

विधानभवनात शाईचे पेन आणण्यास मनाई आहे, मग मुख्यमंत्र्यांचे शाईचे पेन असेल तर जप्त करा असे पवार बोलल्यानंतर मुख्यमंत्र्यांना ते कशा संदर्भात बोलत आहेत हे लक्षात आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ncp leader ajit pawar criticized shinde fadnavis govt in maharashtra winter session 2022