शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीने आणले नाकीनऊ

By admin | Updated: March 13, 2015 02:39 IST

सलग तीन वर्षांपासून सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी तर पूर्णपणे नाउमेद झालाच आहे, तर दुसरीकडे वारंवार सर्वेक्षण करावे लागत असल्याने महसूल यंत्रणेच्याही नाकीनऊ आले आहे.

चंद्रशेखर बोबडे नागपूर सलग तीन वर्षांपासून सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी तर पूर्णपणे नाउमेद झालाच आहे, तर दुसरीकडे वारंवार सर्वेक्षण करावे लागत असल्याने महसूल यंत्रणेच्याही नाकीनऊ आले आहे. कितीदा पंचनामे करायचे, कितीदा मदत वाटप करायची, असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे.२०१२-१३ पासून सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, गारपीट तर कधी अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम आणि आताचा रबी हंगाम हातून गेला आहे. हातातील सर्व पुंजी लावूनही काहीही हाती येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची निराशा पसरली आहे. सरकारकडून होणारी मदत तुटपुंजी असल्याने त्यांच्याविषयी नाराजी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याने सरकारवर टीका होत आहे. ही टीका टाळण्यासाठी पाऊस, गारपीट झाले की सर्वेक्षण करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले जाते. पूर्वी हे काम कृषी खात्याकडून केले जात होते. आता महसूल यंत्रणा त्यासाठी राबत आहे. खरीप हंगामात झालेल्या पीकहानीचे सर्वेक्षण आणि नुकसानीचा आढावा अद्याप संपला नसतानाच डिसेंबर महिन्यात पुन्हा गारपीट व अवकाळी पाऊस झाला. अधिवेशन सुरू असल्याने शासनाने पुन्हा फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. विभागातील चार हजारांवर गावाची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली. त्यानुसार शासनाने मदत जाहीर केली. ही मदत वाटप करण्याच्या प्रक्रियेत महसूल यंत्रणा गुंतली होती. फेब्रुवारी अखेरपर्यंत हे काम चालले. ते संपत नाही तोच १ आणि २ मार्चला पुन्हा अवकाळी पाऊस आला. त्यानंतर अजूनही काही भागात गारपीट होतच आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागपूर विभागातील ३१ तालुक्यांतील ७० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राला याचा फटका बसला आहे. त्यात नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ४२ हजार हेक्टरचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये आढावा बैठक घेऊन बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा यंत्रणा सर्वेक्षणाच्या कामाला जुंपणार आहे. कितीवेळा सर्वेक्षण करायचे व कितीवेळा पंचनामे करायचे, याबाबत आता प्रशासनात चर्चा सुरू झाली आहे. यंत्रणेने पावसाची धास्तीच घेतली आहे.