राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून कुलगुरूंचा पुतळा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 20:49 IST2019-07-10T20:48:02+5:302019-07-10T20:49:35+5:30

बुधवारी तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचे पुतळा जाळून संताप व्यक्त केला.

Nationalist student Congress burnt the Vice-Chancellor's statue | राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून कुलगुरूंचा पुतळा जाळला

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून कुलगुरूंचा पुतळा जाळला

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीए भाग २ च्या अभ्यासक्रमातील इतिहास विषयात आरएसएसचा इतिहास समाविष्ट केल्याने गेल्या तीन दिवसांपासून कुलगुरुंना चांगलेच टार्गेट केले जात आहे. बुधवारी तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचे पुतळा जाळून संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित सिंह, अभिषेक सिंह, राहुल पांडेय, तौसीफ शेख, रवी पराते, रुद्र धाकडे, शदाफ सोफी, प्रतीक कोल्हे, अमित पिचकाटे, प्रवीण पाटील, शुभम पांडेय, सुखविंदर सिंह बल, अक्षय आदमने, शुभम वाघमारे आदी सहभागी होते.

Web Title: Nationalist student Congress burnt the Vice-Chancellor's statue