शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय न्यायाधिकरणे सदस्य नियुक्ती नियमांना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 11:32 IST

: देशातील ग्राहक, प्राप्तिकर, कर्ज वसुली यासह विविध १९ राष्ट्रीय न्यायाधिकरणांमध्ये सदस्य नियुक्तीकरिता निर्धारित करण्यात आलेल्या नियमांच्या वैधतेला मुुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका नियम कायद्याचे उल्लंघन करणारे असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील ग्राहक, प्राप्तिकर, कर्ज वसुली यासह विविध १९ राष्ट्रीय न्यायाधिकरणांमध्ये सदस्य नियुक्तीकरिता निर्धारित करण्यात आलेल्या नियमांच्या वैधतेला मुुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भात सिटिझन्स फोरम फॉर इक्वॅलिटीचे अध्यक्ष मधुकर कुकडे व कन्झुमर फोरम बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. ए. एम. काझी यांनी रिट याचिका दाखल केली आहे.केंद्र सरकारने राष्ट्रीय न्यायाधिकरणांमध्ये सदस्य नियुक्ती व पात्रतेसंदर्भात फायनान्स अ‍ॅक्ट-२०१७ अंतर्गत नवीन नियम निर्धारित केले आहेत. ते नियम ‘रॉजर मॅथ्यू वि. साऊथ इंडियन बँक’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध व संबंधित राष्ट्रीय न्यायाधिकरणांसंदर्भातील मुख्य कायद्यांमधील तरतुदींचे उल्लंघन करणारे आहेत. सदस्य निवड समितीमध्ये केंद्र सरकारच्या दोन प्रतिनिधींचा समावेश राहणार आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप होणार आहे. न्यायाधिकरण सदस्याकरिता वाणिज्य, शिक्षण, आर्थिक, व्यावसायिक, विधी, प्रशासन इत्यादी क्षेत्रांतील २५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक करण्यात आले आहे. हा निकष अन्यायकारक आहे. त्यामुळे न्यायाधिकरणांमध्ये केवळ वयोवृद्ध सदस्यांची नियुक्ती होईल. १० वर्षांचा अनुभव असणारे वकील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदासाठी पात्र आहेत. परंतु, त्यांना राष्ट्रीय न्यायाधिकरणचे सदस्य होण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता वादग्रस्त नियम अवैध ठरवून रद्द करण्यात यावेत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.केंद्र व राज्य सरकारला नोटीसयाचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने केंद्रीय वित्त मंत्रालय, विधी व न्याय मंत्रालय, ग्राहक मंत्रालय व राज्याचे मुख्य सचिव यांना नोटीस बजावून २१ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर व अ‍ॅड. रोहन मालविया, केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर तर, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांनी कामकाज पाहिले.ग्राहक आयोगातील नियुक्त्या याचिकेवरील निर्णयाधीनराष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगातील सदस्यांची सहा रिक्त पदे भरण्यासाठी वादग्रस्त नियमानुसार ११ मार्च २०२० रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. पात्र उमेदवारांकडून ३० मार्चपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. याचिकाकर्त्यांनी या प्रक्रियेच्या वैधतेलाही आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने या सदस्यांची नियुक्ती सदर याचिकेवरील निर्णयाधीन राहील, असा अंतरिम आदेश दिला आहे.

 

टॅग्स :Courtन्यायालय