पारशिवनी येथे राष्ट्रीय क्रीडा दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:17 IST2021-09-02T04:17:15+5:302021-09-02T04:17:15+5:30

पारशिवनी : शहरातील महात्मा गांधी कला वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन अर्थात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे ...

National Sports Day at Parshivani | पारशिवनी येथे राष्ट्रीय क्रीडा दिन

पारशिवनी येथे राष्ट्रीय क्रीडा दिन

पारशिवनी : शहरातील महात्मा गांधी कला वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन अर्थात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लोकचंद जाधव, तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राकेश कभे, प्रा. प्रमोद गोरडे, प्रा. डॉ. ज्ञानेश शेंडे, शारीरीक शिक्षण विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर कहाते उपस्थित होते. प्राचार्य डॉ. लोकचंद जाधव यांनी भाषणातून मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रा. डॉ. सुधीर कहाते यांनी मानवी आराेग्य व दैनंदिन जीवनात खेळाचे महत्त्व समजावून सांगितले. प्रा. डॉ. काशिनाथ मानमोडे यांनी संचालन केले, तर प्रा. महेश चोंदे यांनी आभार मानले.

Web Title: National Sports Day at Parshivani