शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

नॅशनल मीडिया नव्हे कमर्शियल टीव्ही

By admin | Updated: July 30, 2016 02:27 IST

देशातील राष्ट्रीय मीडिया मीडिया नसून कमर्शियल टीव्ही आहेत. त्यांना देशातील सामाजिक प्रश्न दिसत नाही.

देशात पर्यायी मीडियाची गरज : तिस्ता सेटलवाड यांचे रोखठोक मत नागपूर : देशातील राष्ट्रीय मीडिया मीडिया नसून कमर्शियल टीव्ही आहेत. त्यांना देशातील सामाजिक प्रश्न दिसत नाही. ते केवळ कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे देशातील सामान्यजनांचे, कामगारांचे, विद्यार्थ्यांचे, दलित, शोषितांचे, आदिवासींचे प्रश्न मांडण्यासाठी देशात पर्यायी मीडियाची आवश्यकता आहे, असे रोखठोक मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी येथे मांडले. इंडियन सोशल अ‍ॅक्शन फोरम (इन्साफ) आणि ‘जो शहर चलाते है वही शहर बनाते है’ नागरिक अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अघोषित आणीबाणी : काय हे एक गुजरात मॉडेल आहे’ या विषयावर शुक्रवारी विनोबा विचार केंद्र येथे आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू हरीभाऊ केदार होते. वीरेंद्र विद्रोही हे प्रमुख अतिथी होते. तिस्ता सेटलवाड म्हणाल्या, यापूर्वीही परिस्थिती चांगली होती असे नाही, परंतु आजची परिस्थिती भयावह आहे. सेलटवाड यांनी मीडियसंबंधीचे एक उदाहरण सांगितले की गुजरात मॉडेलबाबत मोठा गवगवा केला गेला. परंतु गुजरात मॉडेल कसे धोकादायक आहे, यावर एका विद्वानाने पुस्तक लिहिले होते. त्यावर मीडियामध्ये चर्चा घडून यावी, यासाठी आपण देशातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मोठमोठ्या पत्रकारांना गळ घातली. परंतु त्यांना यावर चर्चाच होऊ द्यायची नसल्याचे त्यांचे उत्तर होते. यावरून मीडियाची भूमिका काय हे दिसून येते. गुजरातमध्ये कुणाचा विकास झाला असेल तर तो केवळ अंबानी व अदानीचा झाला आहे. जम्मू आनंद यांनी प्रास्ताविक केले. संजय शेंडे यांनी संचालन केले. (प्रतिनिधी) हिंदू राष्ट्र निर्मितीचा पाया ‘गुजरात मॉडेल’ संविधान मोडून हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा पाया गुजरातमध्ये घातला गेला. तेच गुजरात मॉडेल आहे. यासाठी आरएसएसने नियोजित पद्धतीने काम केले. जिथे राजकीय व सामाजिक प्रश्नांना वाव नाही, चर्चेची संधी नाही, विरोधाला वाव नाही, यालाच व्हायब्रंट गुजरात या नावाने प्रसिद्ध करण्याचे षड्यंत्र रचल्या गेले. यासाठी आंतरराष्ट्रीय एजन्सीची मदत घेतल्या गेली. ते मॉडेल आज देशात लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज देशात आरएसएस प्रणित सरकार सत्तेत आहे. त्याचे केवळ बाहेरील आवरण लोकशाहीचे आहे. आत आरएसएसच्या विचारांचीच मंडळी राहतील. त्यामुळे ते देशासाठी अधिक घातक आहे. संविधान वाचवण्यासाठी एकजुटीची गरज भारताची राष्ट्रीयता ही संविधानाच्या आधारावर असावी. गैरसंविधानिक गोष्टी नाकारल्या जाव्यात, परंतु देशात उलट होत आहे. तेव्हा आजच्या घडीला देश वाचवायचा असेल तर संविधान वाचवण्याची गरज आहे. त्यामुळे संविधानाच्या संरक्षणासाठी सर्व समान विचारांच्या मंडळींनी एकजूट होऊन लढण्याची गरज आहे. सध्या देशाच्या संसदेत दोन तृतियांश खासदार हे कोट्यधीश आहेत. त्यापैकी ७५ टक्के खासदार उद्योगपती, खाण, मीडिया मायनिंग, टेलिकॉम, मीडियाचे मालक आहेत. अशा परिस्थितीत सामान्य लोकांचे प्रश्न संसदेत उचलल्या जाण्याची शक्यता कमीच आहे. तेव्हा आपल्या विचारांचे किमान ५० ते ६० खासदार संसदेत कसे जातील, याचाही विचार व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.