नाना पटोले यांचे मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे; चंद्रशेखर बावनकुळे यांचे पटोले यांना प्रतिउत्तर

By आनंद डेकाटे | Updated: June 12, 2025 16:41 IST2025-06-12T16:40:07+5:302025-06-12T16:41:31+5:30

Nagpur : नाना पटोले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ अशी टीका केली होती

Nana Patole's mind and brain have been corrupted; Chandrashekhar Bawankule's reply to Patole | नाना पटोले यांचे मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे; चंद्रशेखर बावनकुळे यांचे पटोले यांना प्रतिउत्तर

Nana Patole's mind and brain have been corrupted; Chandrashekhar Bawankule's reply to Patole

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
कॉंग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे मन आणि मेंदू भ्रष्ट झाला असून ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याची टीका करत राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून प्रतिउत्तर दिले.

पाकिस्तान विरुद्ध केंद्र सरकारने केलेल्या ' ऑपरेशन सिंदूर' कारवाईवर कॉंग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ अशी टीका केल्यानतंर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोले यांना एक्सवरून प्रतिउत्तर देत त्यांचा चांगलाच समाचार घेतला ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे बावनकुळे म्हणाले.

भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणे म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्यांचा अपमान नाही तर संपूर्ण करोडो भारतीयांचा अपमान आहे. नाना पटोले यांच्या या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत, याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही? नाना, ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे. ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्यगाथा असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Web Title: Nana Patole's mind and brain have been corrupted; Chandrashekhar Bawankule's reply to Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.