नागराज, प्राजक्ताने राखले जेतेपद; उत्साहाने धावले नागपूरकर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 03:01 AM2020-02-03T03:01:26+5:302020-02-03T03:01:48+5:30

प्लास्टो नागपूर महामॅरेथॉन

Nagraj, the title of prize holder; Nagpurkar ran with enthusiasm | नागराज, प्राजक्ताने राखले जेतेपद; उत्साहाने धावले नागपूरकर

नागराज, प्राजक्ताने राखले जेतेपद; उत्साहाने धावले नागपूरकर

Next

नागपूर : भल्या पहाटे थंडीची चादर दूर करत हजारो नागपूरकरांनी रविवारी ‘प्लास्टो नागपूर महामॅरेथॉन’मध्ये सहभाग घेतला. त्यात ढोलताशे, लेझिम आणि आकाशात विविध रंगांची उधळण करणारी आतषबाजी, तरुण-तरुणी, विद्यार्थी, दिव्यांग धावपटूंचा ओसंडून वाहणाऱ्या उत्साही सहभागाला नागपूरकरांनी पुष्पवृष्टी करून दिलेली दिलखुलास दाद, धावपटूंच्या सोबतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, डोळ्यांचे पारणे फेडणारे नीटनेटके नियोजन, अशा जोशपूर्ण वातावरणात रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे आरसी प्लास्टो टँक्स अ‍ॅन्ड पाईप्स प्रा. लिमिटेड हे मुख्य प्रायोजक होते तर नागपूर महामेट्रो सहप्रायोजक होते.

‘लोकमत समूह’ आयोजित या महामॅरेथॉनमध्ये खुल्या गटातील २१ कि.मी. अंतराच्या स्पर्धेत पुरुषांमध्ये नागपूरचा नागराज खुरसणे तर महिलांमध्ये प्राजक्ता गोडबोले यांनी बाजी मारली. नागराजने २१ कि.मी.चे अंतर १ तास १० मिनिटे ३४ सेकंदात पूर्ण केले. प्राजक्ताने २१ कि.मी.चे अंतर १ तास २४ मिनिटे १० सेकंदात पूर्ण केले. नागराज व प्राजक्ता यांनी सलग दुसºया वर्षीही अव्वल स्थान पटकावत आपापल्या गटात जेतेपद राखले.

सकाळी ६.१६ वाजता २१ कि.मी. अंतराच्या खुल्या गटातील शर्यतीला लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, लोकमतचे संपादकीय संचालक करण दर्डा, राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार कृपाल तुमाने, आमदार अनिल सोले, आमदार मोहन मते, आमदार विकास ठाकरे, महापौर संदीप जोशी, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, लोकमतचे संचालक परिचालन अशोक जैन, लोकमतचे युनिट हेड नीलेश सिंग, लोकमतचे संपादक दिलीप तिखिले, निवासी संपादक गजानन जानभोर, लोकमतचे महाव्यवस्थापक आशिष जैन, ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या हेड रुचिरा दर्डा, लोकमत समूहाचे इव्हेंट हेड रमेश डेडवाल, लोकमत नागपूरचे इव्हेंट हेड आतिश वानखेडे, प्लास्टो टँक अ‍ॅन्ड पाईप्सचे संचालक विशाल व नीलेश अग्रवाल, एचडीएफसी लिमिटेडचे बिझनेस हेड रजनीश शाहू, सेंट पॉल स्कूलचे संचालक राजाभाऊ टाकसाळे, ट्रीट आईस्क्रीमचे संचालक अमोल चकनलवार, महामेट्रोचे उपमहाव्यवस्थापक (कार्पोरेट कम्युनिकेशन) अखिलेश हळवे, इंडियन आॅईलचे उपमहाव्यवस्थापक एन.पी. रोडगे, कोटक महिंद्रा बँकचे क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक अभिजितसिंग राठोड, शारदा क्लासेसचे संचालक नारायण शर्मा, एलिक्सिस हॉस्पिटलचे वरिष्ठ प्रशासक डॉ. तुषार गावड, विवांतेचे व्यवस्थापक संचालक पृथ्वीराज जगताप व रेस डायरेक्टर संजय पाटील आदींनी ‘फ्लॅग आॅफ’ केल्यानंतर धावपटू चित्त्याच्या चपळाईने धावले.

विविध गटातील निकाल

२१ कि. मी. (खुला गट-पुरुष)

१. नागराज खुरसणे १:१०:३४
२. शुभम मेश्राम १:१२:४४,
३. लीलाराम बावणे १:१२:४४.

२१ कि. मी. (खुला गट-महिला) : १. प्राजक्ता गोडबोले १:२४:१०, २. प्राची गोडबोले १:२६:१९, ३. स्वाती पंचबुद्धे १:३१:५५.

१० कि. मी. (खुला गट-पुरुष) : १. लीलेश्वर ००:३४:३२,२. शादाब पठाण ००:३४:३५,, ३. शाहनवाज खान ००:३४:४१,

१० कि. मी. (खुला गट-महिला) : १. शीतल भगत ००:३७:५५,, २.रुतुजा शेंडे ००:४०:१३, ३. पूजा श्रीडोळे ००:४०:३०,

१० कि. मी. (प्रौढ गट-पुरुष) : १. सुरेशचंद्र शर्मा ००:४१:४२, २. रवींद्र बालपांडे ००:४४:२६, ३. नागराज भोयर ००:४६:५३

१० कि. मी. (प्रौढ गट-महिला) : १. विद्या धापोडकर ००:५३:१०. बुला मोंदळ ००:५६:२५, ३. रेणू कौर सिद्धू ०१:०४:०२

२१ कि. मी. (डिफेन्स गट-पुरुष) : १. देवेंद्र चिखलोंडे ०१:१२:४४, २. जितेंद्र सिंग ०१:१३:५६, ३.विक्की राऊत ०१:१५:५१

२१ कि. मी.(डिफेन्स गट-महिला) : १. योगिता वाघ ०१:२८:०४, २. यामिनी ठाकरे ०१:३४:४६ , ३. मीनल भेंडे ०१:४३:३८

२१. कि. मी.(प्रौढ गट-पुरुष)
पांडुरंग पाटील ०१:२६:२३,
कैलाश माने ०१:२६:२७

२१ कि. मी. (प्रौढ गट-महिला)
१. शारदा भोयर ०१:५२:१९,
२. शोभा यादव ०१:५५:०५,
३. दर्शना आकाश मोहता ०२:१४:३४

आजच्या ताणतणाव आणि धकाधकीच्या जीवनात आरोग्य आणि व्यायामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘महामॅरेथॉन’च्या माध्यमातून ‘लोकमत’ सगळ्यांना आरोग्यदायी जीवनाचा कानमंत्र देत आहे. या रनमुळे नागपूरची रविवारची सकाळ सकारात्मक ऊर्जेने भारलेली होती. नागपूरने दिलेला हा प्रतिसाद आणि ऊर्जा आम्हाला पुढे वर्षभर काम करण्यासाठी प्रोत्साहित करेल. - रुचिरा दर्डा, लोकमत महामॅरेथॉनच्या प्रमुख

Web Title: Nagraj, the title of prize holder; Nagpurkar ran with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.