नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांना देण्यासाठी औषधेच नाहीत; ४३५ रुग्णांचा जीव आला धोक्यात !

By सुमेध वाघमार | Updated: February 3, 2026 14:47 IST2026-02-03T14:46:16+5:302026-02-03T14:47:05+5:30

Nagpur : उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालय, जे विदर्भासह लगतच्या राज्यांतील गरीब मनोरुग्णांसाठी आशेचा शेवटचा किरण मानले जाते, ते सध्या स्वतःच 'व्हेंटिलेटर'वर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Nagpur's Regional Psychiatric Hospital has no medicines to provide to patients; 435 patients' lives are in danger! | नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांना देण्यासाठी औषधेच नाहीत; ४३५ रुग्णांचा जीव आला धोक्यात !

Nagpur's Regional Psychiatric Hospital has no medicines to provide to patients; 435 patients' lives are in danger!

सुमेध वाघमारे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालय, जे विदर्भासह लगतच्या राज्यांतील गरीब मनोरुग्णांसाठी आशेचा शेवटचा किरण मानले जाते, ते सध्या स्वतःच 'व्हेंटिलेटर'वर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या दीड वर्षापासून मुंबईच्या आरोग्य विभागाकडून औषधांचा पुरवठाच झालेला नाही. परिणामी, भरती असलेल्या ४३५ रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. शिवाय, दररोज येणारे २५० बाह्यरुग्णांवर उपचार करणे मनोरुग्णालय प्रशासनाला अडचणीचे झाले आहे. मनोरुग्णांवर उपचार करताना औषधांमध्ये खंड पडणे म्हणजे आजार वाढविणे असे असते. मात्र, आरोग्य विभागाचा लालफितीचा कारभार आणि अपुऱ्या निधीमुळे बहुसंख्य औषधसाठा पूर्णपणे संपला आहे. 'ओलान्झापाइन 'पासून ते 'रिस्पेरिडोन' सारखी महत्त्वाची औषधे नसल्याने रुग्णांचा आजार कमी होण्याऐवजी तो अधिक बळावत आहे. औषधे लिहून देणे नियमबाह्य ठरत असल्याने डॉक्टर हतबल आहेत.

या महत्त्वाच्या औषधांचा 'ठणठणाट'

ओलान्झापाइनः स्किझोफ्रेनिया आणि तीव्र नैराश्यासाठी अनिवार्य.
अॅमिट्रिप्टिलीन : अत्यंत उदास आणि आत्महत्येचे विचार येतात तेव्हा आवश्यक.
रिस्पेरिडोन : आक्रमक हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक,
सोडियम व्हॅल्प्रोएटः फिट्स आणि मेंदूला शांत ठेवण्यासाठी महत्त्वाचे.
पॅसिटेन: औषधांचे साईड इफेक्ट्स रोखण्यासाठी गरजेचे.
टिनिडाझोल : संसर्ग रोखणारे अँटी- बायोटिक, सारख्या महत्त्वाच्या औषधींचा ठणठणाट आहे.

औषधे अचानक बंद केल्यास जिवाला धोका

मानसोपचारतज्ज्ञाच्या मते, ओलान्झापाइनसारखी औषधे अचानक बंद केल्यास रुग्णामध्ये 'विथड्रॉवल सिम्पटम्स' दिसू शकतात. यामुळे रुग्णाचे मानसिक संतुलन अधिक बिघडणे, तो स्वतःला किंवा इतरांना इजा करणे किंवा आत्महत्येसारखे पाऊल उचलणे, अशा घटना घडू शकतात. सरकार या धोक्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल रुग्णांचे नातेवाईक विचारत आहेत.

दीड वर्षांपासून उधारीवर औषधी

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मागील दीड वर्षांपासून आरोग्य विभागाकडून औषधी मिळाले नसल्याने रुग्णालय प्रशासनाने विदर्भातील विविध शासकीय रुग्णालयातून उधारीवर औषधी घेतल्या आहेत. यासंदर्भात आरोग्य सेवा विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तर दिले नाही.

"जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून स्थानिक पातळीवर औषधी खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. शिवाय, वरिष्ठांनाही औषधीच्या तुटवड्याबाबत माहिती दिली असून लवकरच त्यांच्याकडूनही औषधी उपलब्ध होणार आहेत."
- डॉ. सतीश हुमणे, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर

Web Title : नागपुर मनोरोग अस्पताल में दवाओं की कमी, 435 मरीजों का जीवन खतरे में।

Web Summary : नागपुर के क्षेत्रीय मनोरोग अस्पताल में दवाओं की भारी कमी है, जिससे 435 मरीजों की जान खतरे में है। आवश्यक दवाएं उपलब्ध नहीं हैं, जिससे मरीजों की हालत बिगड़ रही है। अस्पताल आपूर्ति की कमी के कारण इनडोर और आउटडोर दोनों मरीजों का इलाज करने के लिए संघर्ष कर रहा है।

Web Title : Nagpur mental hospital faces drug shortage, endangering 435 patients.

Web Summary : Nagpur's regional mental hospital is facing a severe drug shortage, jeopardizing the lives of 435 patients. Essential medicines are unavailable, exacerbating patient conditions. The hospital is struggling to treat both inpatients and outpatients due to lack of supplies.