नागपूरचे प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 12:36 AM2020-05-15T00:36:26+5:302020-05-15T00:42:59+5:30

देशातील १०२ सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये राज्याच्या १०-१२ शहरात नागपूरचाही क्रमांक लागतो. या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पार्टीकुलेट मॅटर म्हणजे धुलिकण होय. मात्र लॉकडाऊनच्या काळात याचे प्रमाण विक्रमी घटले असून एकूणच प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकावर पोहचले आहे.

Nagpur's pollution is at its lowest point in many years | नागपूरचे प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकीवर

नागपूरचे प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकीवर

googlenewsNext
ठळक मुद्देधूलिकणांचे प्रमाण विक्रमी घटले : व्हीएनआयटीचा अभ्यास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील १०२ सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये राज्याच्या १०-१२ शहरात नागपूरचाही क्रमांक लागतो. या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पार्टीकुलेट मॅटर म्हणजे धुलिकण होय. मात्र लॉकडाऊनच्या काळात याचे प्रमाण विक्रमी घटले असून एकूणच प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकावर पोहचले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या निर्देशानुसार विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) द्वारे गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण केले जात आहे. व्हीएनआयटीने लॉकडाऊनच्या काळात एप्रिल महिन्यात शहरातील चार स्थानावरून प्रदूषणाचे परीक्षण केले आहे. यात प्रामुख्याने धूलिकण (पीएम-१०) तसेच सल्फर डायऑक्साईड (एसओ2), नायट्रोजन डायऑक्साईड (एनओ2) यांच्या प्रदूषणाचा अभ्यास केला आहे. अभ्यास केलेल्या चार ठिकाणांमध्ये एमपीसीबीचे सिव्हील लाईन्स येथील कार्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिआर्स उत्तर अंबाझरी मार्ग, एमआयडीसी हिंगणा रोड आणि शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज सदर यांचा समावेश आहे.
व्हीएनआयटीच्या २०१० पासूनच्या अभ्यासानुसार एसओ2 व एनओ2 चे प्रमाण कधीही प्रदूषण मर्यादेच्या बाहेर गेले नाही. शिवाय सिव्हील लाईन्समध्ये धुलिकणांचे प्रमाणही मर्यादेबाहेर गेले नाही. १०० मायक्रोग्रॅम ही सर्वोच्च मर्यादा आहे आणि ६० मायक्रोग्रॅम (म्युग्रॅ)हे आदर्श प्रमाण. मात्र तिन्ही ठिकाणी याचे प्रमाण २०१० पासून एप्रिल महिन्यात कायम मर्यादेच्या बाहेर गेले आहे. २०१५ मध्ये धुलिकणांचे प्रमाण सदर व सीताबर्डी येथे १४० म्युग्रॅ तर एमआयडीसी येथे १८० म्युग्रॅम पर्यंत वाढले होते. इतर वर्षी ते १०० च्या आसपास राहिले आहे. मात्र यावेळी हेच प्रमाण ६० ते ६५ म्युग्रॅम पर्यंत खाली घसरले आहे. ४० ते ६० वर राहणाऱ्या एसओ2 व १० ते २० दरम्यान राहणाऱ्या एनओ2 ने ८० म्युग्रॅमची मर्यादा कधी ओलांडली नाही.
मोठ्या प्रमाणात चालणारे उद्योग, बांधकाम कार्य, कचरा जाळणे आणि काही प्रमाणात वाहनांमुळे धुलिकणांचे प्रदूषण अधिक असते. लॉकडाऊन काळात उद्योग व बांधकाम बंद आहेत व कचरा जाळणे दिसून येत नाही. त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुढचे अनेक वर्षे याचा फायदा होणार आहे.
- डॉ. दिलीप लटाये, सिव्हील इंजिनिरिंग विभाग, व्हीएनआयटी

Web Title: Nagpur's pollution is at its lowest point in many years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.