शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

नागपूरच्या गोरेवाडा तलावाकाठी ओल्या पार्ट्या; जंगलाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:33 AM

गोरेवाडा जंगलासाठी महापालिका वॉटर फिल्टरकडील तलावाचा २५ हेक्टरचा खुला परिसर डोकेदुखी झाला आहे. अनेकदा युवकांच्या टोळ्या चूल पेटवून पार्ट्या करतात. या चुलीतून उडणाऱ्या ठिणग्याही आग लागण्याचे कारण ठरु शकतात.

ठळक मुद्देमहापालिका क्षेत्राच्या बाहेरील नागरिकांची घुसखोरीअसामाजिक तत्त्वांचा उपद्रवआगीच्या घटना वाढल्यामुळे वन अधिकारीही चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरेवाडा जंगलासाठी महापालिका वॉटर फिल्टरकडील तलावाचा २५ हेक्टरचा खुला परिसर डोकेदुखी झाला आहे. सूत्रानुसार गोरेवाडा गावाकडून तलावात पोहण्यासाठी युवकांची नेहमीच गर्दी राहते तर असामाजिक तत्त्व जुगार खेळण्यासाठी आणि दारू पिण्यासाठी हा परिसर सुरक्षित समजतात. अनेकदा युवकांच्या टोळ्या वॉटर फिल्टरच्या जवळपास चूल पेटवून पार्ट्या करतात. या चुलीतून उडणाऱ्या ठिणग्याही आग लागण्याचे कारण ठरु शकतात. मानकापूर बायपास काटोल रोडच्या दिशेनेही जंगलात आग लागण्याच्या घटना चिंता वाढवत आहेत. दोन महिन्यापूर्वी गोरेवाडात आगीच्या ९ ते १० घटना घडल्या आहेत.बुधवारी रात्री तलावाच्या महापालिकेच्या भागातील आग वाढल्यामुळे गोरेवाडाच्या राखीव वनक्षेत्रात आग लागली असती. परंतु गस्त घालत असलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या वेळीच ही बाब लक्षात आल्यामुळे त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.गुरुवारी सायंकाळी मानकापूर रिंग रोडकडून कुणीतरी गोरेवाडाच्या भिंतीला लागून कचऱ्यात आग पेटविली. त्याची माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांना ब्लोअर, पाण्याचे टँकर घेऊन आग विझविण्यासाठी धावपळ करावी लागली. आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणी संग्रहालयाच्या बांधकामापूर्वीच काटोल रोडच्या दोन्ही बाजुने वनक्षेत्राला भिंत तयार करुन सुरक्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आधी गोरेवाडा तलाव, रेस्क्यु सेंटर आणि जंगल सफारी क्षेत्राच्या चारी बाजूने १६ किलोमीटरसह दाभाला लागून नवनिर्मित भारतीय व इतर सफारीच्या क्षेत्राचीही मजबूत सुरक्षा भिंत तयार करुन घेराबंदी करण्यात आली आहे. त्यानंतरही गोरेवाडा जंगलात वारंवार आगीच्या घटनात वाढ झाली आहे.

मानकापूर रिंग रोडवर कचरा घरमानकापूर रिंग रोडकडून गोरेवाडाच्या सुरक्षा भिंतीला लागून नागरिकांनी मोठे कचरा घर तयार केले आहे. येथे पोते, रेक्झिन आणि कचरा टाकून जाळण्यात येतो. या कचऱ्याला नेहमीच आग लावण्यात येते. गुरुवारीही या कचऱ्याला भीषण आग लागली.कचऱ्याला लागलेल्या आगीच्या ठिणग्या सुरक्षा भिंतीच्या आत पोहोचण्याची शक्यता पाहून वन कर्मचारी आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.

आतून सर्व्हिस रोड तयार करून गस्तगोरेवाडाचे आरएफओ सुनील सोनटक्के यांनी सांगितले की, वन क्षेत्राच्या आतून गोरेवाडाच्या सुरक्षा भिंतीला लागून चारही सर्व्हिस रोड तयार करून नियमित गस्त सुरू करण्यात आली आहे. गोरेवाडाला लागून असलेल्या गाव, वस्त्यात बैठक घेऊन जंगलाचे महत्त्व सांगून घटनांची माहिती मिळविण्यासाठी समन्वय प्रस्थापित करण्यात येत आहे. त्यानुसार आजूबाजूच्या गावातील नागरिकांसाठी जंगल सफारीचे आयोजनही करण्यात आले होते.

संबंधित क्षेत्र महापालिकेच्या अधिकार क्षेत्रातगोरेवाडाचे डीएफओ नंदकिशोर काळे यांनी सांगितले की, वनक्षेत्रात आगीच्या घटना थांबविण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात येतात. तलावाच्या भागाकडून चिंता वाढली आहे. परंतु हा परिसर महापालिकेच्या अधिकार क्षेत्रात येत असल्यामुळे गोरेवाडा व्यवस्थापन त्यात हस्तक्षेप करीत नाही. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा होत आहे.

टॅग्स :fireआग