शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरची ही चिमुकली आहे सगळ्यात भारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 00:26 IST

गिरिशा आर्या हिने आग्रा येथे पार पडलेल्या ‘मिस किडस् युनिव्हर्स’चा शीर्षक किताब पटकावला आहे. हा किताब पटकावणारी गिरिशा ही या वयातील पहिलीच नागपूरकर ठरली असून, तिच्या या यशाने देशात नागपूरचे नाव गौरविल्या गेले आहे.

ठळक मुद्देगिरिशा आर्या ठरली ‘मिस किडस् युनिव्हर्स’१० वर्षांत विविध गुणवैशिष्ट्यांचे १९ पुरस्कार खात्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध गुणवैशिष्ट्यांसाठी अनेक पुरस्कार प्राप्त करणाऱ्या गिरिशा आर्या हिने आग्रा येथे पार पडलेल्या ‘मिस किडस् युनिव्हर्स’चा शीर्षक किताब पटकावला आहे. हा किताब पटकावणारी गिरिशा ही या वयातील पहिलीच नागपूरकर ठरली असून, तिच्या या यशाने देशात नागपूरचे नाव गौरविल्या गेले आहे.कोराडी रोडवरील लिव्हरेज ग्रीन परिसरातील ट्युलिप बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या संजय व रिना आर्या यांची गिरिशा ही मुलगी असून, तिने या कोवळ्या वयातच आगामी ध्येयधोरणावर चालण्याची किमया साधली आहे. खुशी इव्हेंटस्च्या वतीने २० ऑक्टोबर रोजी आग्रा येथील ओरिएण्ट ताजमध्ये पार पडलेल्या या मुलांच्या स्पर्धेतील अंतिम फेरीत तिने आशिया खंडातील तब्बल ६० स्पर्धकांवर आघाडी घेत ‘मिस किडस् युनिव्हर्स’ चा किताब आपल्या नावे केला. यात पाकिस्तान, भूतान, बांगलादेश आदी देशांतूनही स्पर्धक सहभागी झाले होते. प्रसिद्ध पंजाबी गायक जस्सी गिल व बब्बल राय, अभिनेता प्रियांक शर्मा व अभिनेत्री अनमोल चौधरी यांच्या हस्ते गिरिशाने हा पुरस्कार स्वीकारला. वय वर्ष एक ते पाच, ६ ते १२, १३ ते १८, १९ ते ३० व ३० वर्षाच्या पार अशा पाच गटात पार पडलेल्या या स्पर्धेत गिरिशाने ६ ते १२ वयोगटात हा पुरस्कार प्राप्त केला. गिरिशाचे मंगळवारी नागपुरात आगमन होताच रेल्वेस्थानकावर लॉयन्स क्लबच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच तिच्या शेजारच्यांनी गिरिशाच्या विजयाचा जल्लोष करीत आनंद साजरा केला. विशेष म्हणजे, याच स्पर्धेत गिरिशाचा लहान भाऊ पाच वर्षीय तनय यानेही ‘मोस्ट स्टायलिश किड ऑफ दि युनिव्हर्स’ हा किताब पटकावला आहे.एवढ्या कमी वयात गिरिशाची एवढी मोठी भरारी वाखाणण्याजोगी आहे. ती पोदार इंटरनॅशनल स्कूलची पाचव्या वर्गाची विद्यार्थिनी असून, तिने आतापर्यंत वेगवेगळ्या स्पर्धेत १९ किताब स्वत:च्या नावावर केले आहेत. त्यात ‘पप्पा की परी’, तीनवेळा ‘बेस्ट किड मॉडेल इन इंडिया’, ‘बच्चो की दुनिया फॅशन शो’चा किताब, ‘एकलनृत्याचा किताब’,‘ऑल इडिया मॉडेलिंग कॉन्टेस्ट’चा किताब आदींचा समावेश आहे.मला ‘मिस युनिव्हर्स’ बनायचे आहे - गिरिशा आर्यामी नृत्य, अभिनय आदींमध्ये तयारी करीत आहे. माझे आई-वडील मला यात मार्गदर्शन करीत असतात. माझ्या परिश्रमाने आणिआई-वडिलांच्या मार्गदर्शनात मला पुढे जायचे आहे. ‘मिस युनिव्हर्स’ बनण्याचे माझे स्वप्न असून, त्याच स्पर्धेसाठीची ही पहिली पायरी म्हणून बघत असल्याचे गिरिशा आर्या हिने सांगितले.मुलांचे स्वप्न पूर्ण करणे आमचे कर्तव्यच - संजय आर्यामुलांनी स्वप्न बघावे आणि ते पूर्ण करण्याचे प्राथमिक प्रयत्न पालकांचेच असते. पुढे त्यांचे परिश्रम आणि जिद्दच त्यांचा मार्ग प्रशस्त करते. गिरिशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तिला नियमित मार्गदर्शन करीत असल्याचे गिरिशाचे वडील संजय आर्या यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर