शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

नागपूरच्या डॅशिंग लेडी उषाने आणले तस्करांच्या नाकीनऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 10:58 AM

मागील वर्षभराच्या कालावधीत तिने २७ दारू तस्करांसह प्रवाशांचे साहित्य पळविणाऱ्या अन् गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपींचा बंदोबस्त करून त्यांच्या नाकीनऊ आणले आहे. उषा तिग्गा असे या आरपीएफमधील ‘डॅशिंग लेडी’चे नाव आहे.

ठळक मुद्देवर्षभरात २७ दारु तस्करांचा बंदोबस्त

दयानंद पाईकरावलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: वडील खासगी संस्थेत चालक म्हणून कामाला. आई गृहिणी. लहाणपणापासून खाकी वर्दी घालण्याची इच्छा उषाच्या मनात होती. त्यानुसार जीवापाड मेहनतही केली. विविध स्पर्धा गाजवून मेडल पदरात पाडले. मेहनतीच्या भरवशावर रेल्वे सुरक्षा दलात नोकरी मिळविली. नोकरी करताना उषाने इमानदारीने आपले कर्तव्य बजावत तस्करांच्या नाकीनऊ आणले. मागील वर्षभराच्या कालावधीत तिने २७ दारू तस्करांसह प्रवाशांचे साहित्य पळविणाऱ्या अन् गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपींचा बंदोबस्त करून त्यांच्या नाकीनऊ आणले आहे.उषा तिग्गा असे या आरपीएफमधील ‘डॅशिंग लेडी’चे नाव आहे. उषाचे आईवडील मूळचे छत्तीसगडमधील. घरची परिस्थिती बेताची असतानाही उषाने एम.ए. (लायब्ररी सायन्स), एम. ए. (एशियन इंडियन हिस्ट्री कल्चर अँड आर्केलॉजी) पर्यंत शिक्षण घेतले. केवळ शिक्षणच न घेता १०० मिटर रनिंग, लाँग जम्प, शॉटपुट, थालीफेक, भालाफेक, रिले दौड या स्पर्धातही तिने बाजी मारली. रिले दौडमध्ये बेंगळुरु, गोवा आणि म्हैसूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने तिसरा क्रमांक पटकावला तर शॉटपुट, थालीफेक आणि भालाफेकच्या राज्यस्तरीय स्पर्धेत मेडल मिळविले. इंटर रेल्वेच्या १०० मिटर रनिंग स्पर्धेत विशाखापट्टणम येथे बेस्ट अ‍ॅथ्लिटचा किताबही मिळविला. आपल्या मेहनतीने उषा रेल्वे सुरक्षा दलाच्या नोकरीत पात्र ठरली. नोकरीतही आजपर्यंत तिने अनेक महत्त्वाच्या कारवाया केल्या आहेत. यात प्रवाशांचे मोबाईल, महागडे साहित्य, ट्रॉलीबॅग पळविणाऱ्या अनेक चोरट्यांना तिने रंगेहाथ पकडून संबंधित प्रवाशांना त्यांचे साहित्य परत केले.दारूची तस्करी पकडणे हे रेल्वे सुरक्षा दलाचे नव्हे तर लोहमार्ग पोलिसांचे काम आहे. परंतु ड्युटी करताना मागील वर्षभरात तब्बल २७ वेळा दारूची तस्करी पकडून उषाने रेल्वे सुरक्षा दलाची मान उंचावण्याचे काम केले. यात गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या बांधण्यात उषाला यश मिळाले. रेल्वेस्थानकावर अनेकदा घरून पळून आलेले बालक आढळतात. ते असामाजिक तत्त्वांच्या हाती लागल्यास त्यांचे जीवन उद्ध्वस्त होते. परंतु अशा अल्पवयीन २२ मुले आणि ३ मुलींना उषाने सुखरुप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करून त्यांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले. तिची जिद्द, मेहनत पाहून रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा हे सुद्धा नेहमीच तिला प्रोत्साहन देतात.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस