शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

नागपुरातील तरुणाच्या अवयवदानाने सहा जणांना नवजीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 11:40 PM

३८ वर्षीय तरुण मुलाचे ब्रेनडेड (मेंदूमृत) झाल्याचे कळताच परतेकी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.त्या परिस्थितीतही काळजावर दगड ठेवून मानवातावादी दृष्टिकोनातून अवयवदानाचा निर्णय घेत समाजापुढे एक आदर्श ठेवला. या निर्णयाने मृत्यूचा दाढेत असलेल्या चार रुग्णांना नवे जीवन मिळाले तर दोघांना नवी दृष्टी मिळाली.

ठळक मुद्देपरतेकी कुटुंबीयांचा पुढाकारनागपूरचे हृदय गेले पुण्यालामेडिकलमध्ये चौथे ‘ऑर्गन रिट्रिव्हल’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ३८ वर्षीय तरुण मुलाचे ब्रेनडेड (मेंदूमृत) झाल्याचे कळताच परतेकी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.त्या परिस्थितीतही काळजावर दगड ठेवून मानवातावादी दृष्टिकोनातून अवयवदानाचा निर्णय घेत समाजापुढे एक आदर्श ठेवला. या निर्णयाने मृत्यूचा दाढेत असलेल्या चार रुग्णांना नवे जीवन मिळाले तर दोघांना नवी दृष्टी मिळाली. शरद परतेकी (३८) रा. पार्वतीनगर, असे त्या अवयवदानदात्याचे नाव आहे.शरद बीड येथील विजया बँकेत कार्यरत होता. ११ ऑगस्टला त्याचा अपघात झाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. बीड येथील एका खासगी रुग्णालयात त्यावर शस्त्रक्रिया झाली. परंतु त्याने उपचाराला फारसा प्रतिसाद दिला नाही. त्याला नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी उपचारांची शर्थ केली. मात्र, मंगळवारी रात्री ब्रेनडेड झाल्याची माहिती डॉक्टरांनी परतेकी कुटुंबीयांना दिली. शरदच्या मृत्यूने त्याची वृद्ध आई, पत्नी तसेच दोघे भाऊ व सात महिन्यांचा मुलगा यांना शोकावेग आवरला नाही.मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेडिकल ऑर्गन ट्रान्सप्लांट समितीचे नोडल अधिकारी डॉ. नरेश तिरपुडे, सामाजिक अधीक्षक श्याम पंजाला, प्रार्थना द्विवेदी यांनी परतेकी कुटुंबीयांचे सांत्वन करीत अवयवदानाविषयी समुपदेशन केले. त्यांनी दु:ख बाजूला ठेवून धीरोदात्तपणे हृदय, यकृत, मूत्रपिंड व दोन डोळे (कॉर्निया) दान करण्यास सहमती दर्शविली.मेडिकलच्या डॉक्टरांकडून सूचना मिळताच अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे व समन्वयिका वीणा वाठोरे आदींनी पुढील कायदेशीर कार्यवाही केली. प्रतीक्षा यादीनुसार हृदय पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक, यकृत अ‍ॅलेक्सिस रुग्णालय, एक मूत्रपिंड मेडिकलचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दुसरे मूत्रपिंड केअर हॉस्पिटलच्या रुग्णाला देण्यात आले. ‘कॉर्निया’ मेडिकल नेत्रपेढीस देण्यात आले.पाच मिनिटात हृदय पोहचले विमानतळावरशरीरातून हृदय काढल्यानंतर केवळ चार तासात त्याचे प्रत्यारोपण आवश्यक असते. त्यानुसार वेळेचे नियोजन करण्यात आले. वाहतूक विभागाने ग्रीन कॉरिडोअर करून मेडिकल ते नागपूर विमानतळापर्यंत अवघ्या पाच मिनिटात हृदय पोहचले. तेथून विशेष विमानाने हृदय पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक पोहचून यशस्वी प्रत्यारोपण झाले.अधिष्ठात्यांच्या पुढाकाराने 'ऑर्गन रिट्रॅव्हल'मेडिकलमध्ये गेल्या आठ महिन्यापासून एकही ‘ऑर्गन रिट्रव्हल’ म्हणजे ‘ब्रेनडेड’ रुग्णाकडून अवयवदान झाले नव्हते. यामुळे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये त्यांनी तशा सूचना दिल्या होत्या. बुधवारी झालेले मेडिकलमधील चौथे ‘ऑर्गन रिट्रॅव्हल’ होते. ही शस्त्रक्रिया डॉ. मित्रा, डॉ. तिरपुडे व डॉ. फैजल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पवित्र पटनायक, डॉ. योगेंद्र बनसोड, डॉ. सोमा चाम, डॉ. सुमित हिरे, डॉ. अंकुर संघवी, डॉ. शैलेंद्र अंजनकर, डॉ. समरित गाायधने, डॉ. प्रदीप धुमाने, डॉ. निकिता ढोमणे, डॉ. अजित थॉमस, डॉ. अनिंद्य मुखर्जी, डॉ. दीपक सांगळे, डॉ. नसीम कांबळे आदींनी पूर्ण केली. डॉ. शैलेंद्र मुंदडा यांनी विविध पॅथालॉजी तपासण्या केल्या.सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सहावे ‘कॅडेव्हर’सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बुधवारी सहावे 'कॅडेव्हर' यशस्वी पार पडले. एका ३५ वर्षीय तरुणाला शरदचे मूत्रपिंड दान करण्यात आले. ही यशस्वी शस्त्रक्रिया मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, डॉ. धनंजय सेलूकर, डॉ. प्रतीक लड्ढा, डॉ. चारुलता बावनकुळे, डॉ. पीयूष किंमतकर, डॉ. विशाल रामटेके, डॉ. रितेश बनोदे, डॉ. वंदना आदमने, डॉ. मेहराज शेख आदींच्या सहकार्याने पार पडली.

टॅग्स :Organ donationअवयव दानGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय