शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
4
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
5
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
6
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
7
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
8
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
9
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
10
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
11
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
12
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
13
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
14
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
15
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
16
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
17
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
18
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
19
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
20
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर

नागपूरकरांना  दिलासा :  मालमत्ता करात कोणतीही वाढ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 1:07 AM

२०१९-२० या आर्थिक वर्षात मालमत्ता करात कोणत्याही स्वरुपाची प्रस्तावित करवाढ नाही. मालमत्ताकरांतर्गत महापालिकेतर्फे आकारण्यात येणारे कर तसेच राज्य शासनाच्या करात कोणत्याही स्वरुपाची वाढ प्रस्तावित नाही.

ठळक मुद्देकर विभागाचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९-२० या आर्थिक वर्षात मालमत्ता करात कोणत्याही स्वरुपाची प्रस्तावित करवाढ नाही. मालमत्ताकरांतर्गत महापालिकेतर्फे आकारण्यात येणारे कर तसेच राज्य शासनाच्या करात कोणत्याही स्वरुपाची वाढ प्रस्तावित नाही. महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलम १२६(अ)अंतर्गत मालमत्ता करात समाविष्ट असलेले कर कलम ९९ अंतर्गत पुढील आर्थिक वर्षात आकारण्यात येणार आहेत. २० फेब्रुवारी पूर्वी निश्चित करणे आवश्यक असते. त्यानुसार कर विभागातर्फे हा प्रस्ताव स्थायी समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.प्रस्तावानुसार सन २०१८-१९ या वर्षात आकारण्यात आलेले कर पुढील आर्थिक वर्षात कायम ठेवण्यात आल्याने शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सामान्य कर, मलजल कर, पाणीपट्टी, पाणी लाभ कर, अग्निशमन कर, दिवाबत्तीकर, रस्ते कर, शिक्षण कर, वृक्ष कर, विशेष सफाई कर यात कोणत्याही स्वरुपाची दरवाढ प्रस्तावित नाही. तसेच राज्य शासनाचे कर म्हणून आकारण्यात येणाऱ्या शिक्षण कर (निवासी),शिक्षण कर (अनिवासी), रोजगार हमी कर, मोठ्या निवासी इमारतीकरावर कोणत्याही स्वरुपाची कर वाढ प्रस्तावित नाही.मालमत्ता करात सामान्य कर वार्षिक भाडे मूल्यावर १४ ते ३० टक्के आकारला जातो. हेच दर कायम ठेवण्यात आले आहे. मलजल कर १२ टक्के, पाणीपट्टी १० ते १५ टक्के, मलजल लाभ कर, पाणी लाभ कर, अग्निशमन कर, दिवाबत्ती कर, रस्ते कर, महापालिका शिक्षण कर व वृक्ष कर प्रत्येकी १ टक्क आकारला जातो. प्रस्तावानुसार हाच दर पुढील वर्षी कायम राहणार आहे. विशेष सफाई कर ७ ते १० टक्के (वार्षिक भाडे मूल्यानुसार) आकारला जातो. तोच कायम ठेवण्याचे प्रस्तावित आहे. राज्य शासनाचा शिक्षण कर २ ते १० टक्के (वार्षिक भाडे मूल्यावर) आकारला जातो. तसेच रोजगार हमी कर १ ते ३ टक्के तर मोठ्या निवासी इमारतीवरील १० टक्के कायम ठेवण्याचे प्रस्तावित आहे.सभागृहाकडे मंजुरीसाठी पाठविणारमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ९९ च्या तरतुदीनुसार २० फेब्रुवारी २०१९ पूर्वी या प्रस्तावाला सभागृहाची मंजुरी घेणे आवश्यक असल्याने स्थायी समितीच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव महापालिकेच्या पुढील सर्वसारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर