शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

कोरोनाविरुद्ध लढ्यात नागपूरकर डॉक्टरची मुंबईत सेवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 9:30 PM

नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण असताना डॉक्टर मात्र समर्पित भावनेने देवदूतांप्रमाणे सेवेत लागलेले आहेत. नागपूरचे डॉ. यश अविनाश बानाईत हे सुद्धा त्या समर्पण वृत्तीचे एक नाव होय. डॉ. यश हे गेल्या ७ मार्चपासून मुंबई येथे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना स्क्रिनिंग आणि इतर महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.

ठळक मुद्देएअरपोर्ट टर्मिनलवर ७ मार्चपासून सेवारत : यश बानाईत यांच्या समर्पणाचा शहरवासीयांना अभिमान

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूने महामारीचे रूप धारण करीत संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण असताना डॉक्टर मात्र समर्पित भावनेने देवदूतांप्रमाणे सेवेत लागलेले आहेत. नागपूरचे डॉ. यश अविनाश बानाईत हे सुद्धा त्या समर्पण वृत्तीचे एक नाव होय. डॉ. यश हे गेल्या ७ मार्चपासून मुंबई येथे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना स्क्रिनिंग आणि इतर महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.वैद्यकीय पदवी घेताना प्रत्येक विद्यार्थी शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णांवर पूर्ण क्षमतेने उपचार करण्याची शपथ घेत असतो. त्याचीच प्रचिती सध्या आलेल्या परिस्थितीत पावलोपावली येत आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे आणि क्षणाक्षणाला ही भीती आणखी गडद होत चालली आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराचा सर्वाधिक धोका परदेश प्रवासातून आलेल्यांमध्ये आहे. त्यामुळे या प्रवाशांची कोरोना स्क्रिनिंग अत्यंत महत्त्वाची आहे. हीच जबाबदारी डॉ. यश बानाईत यांच्यावर आहे. डॉ. यश हे मुंबईच्या लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज सायनमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल क्रमांक २ मध्ये ७ मार्चपासून सेवारत आहेत. प्रवाशांच्या कोरोना स्क्रिनिंगसह इतर डॉक्टरांची पोस्टींग व इतर कार्याच्या निरीक्षणाची जबाबदारी पाहत आहेत. दहशतीच्या अशा भीषण परिस्थितीत डॉ. यश हे मोठ्या नेटाने आपली सेवा देत आहेत.एका भयावह विषाणूविरुद्ध एक प्रकारचे विश्वयुद्ध सुरू आहे आणि या युद्धात रुग्णालयांमध्ये सेवा देणारे डॉक्टर आणि नर्सेस सर्वात पुढे असलेले सैनिक आहेत. या परिस्थतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याचे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉ. यश बानाईत यांचे सेवाकार्य प्रत्येक नागपूरकराला अभिमान वाटावा असेच आहे. इतर डॉक्टरांसमवेत त्यांचेही कार्य खऱ्या अर्थाने घेतलेल्या शपथेचे निर्वहन करण्यासारखे आहे. या वैद्यकीय सैनिकांचे कार्य दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरnagpurनागपूरMumbaiमुंबई