लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने गळफास लावल्यामुळे तिचा मृत्यू झाला. सारिका आनंद चौरे (वय २८)असे मृत महिलेचे नाव आहे. ती बेलतरोडीतील महाकाली नगरात राहत होती. सारिकाचा आनंद चौरेसोबत आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. सारिकाचे माहेर बाजूलाच आहे. परिस्थिति गरीब असली तरी सारिकाचा संसार चांगल्या पद्धतीने सुरू होता. २३ मे च्या रात्री ११.३० सुमारास सारिकाने गळफास लावून घेतला. घरच्यांनी तिला तातडीने खाली उतरवून मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बेशुद्ध अवस्थेत तिने तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज दिली. शुक्रवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. सारिकाने कोणत्या कारणामुळे गळफास लावून घेतला याचा पोलिस शोध घेत आहेत.
नागपुरात महिलेने लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 20:41 IST