शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

नागपुरात स्वच्छतेसोबतच होणार वीजनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 12:52 IST

पाणीपुरवठ्यानंतर स्वच्छता ही प्राथमिक गरज आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत होणाऱ्या सर्वेक्षणासोबतच आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्दे‘कचराघरविरहित शहर’ योजनेची मार्चपासून अंमलबजावणी दोन आॅपरेटरवर राहणार संकलनाची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाणीपुरवठ्यानंतर स्वच्छता ही प्राथमिक गरज आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत होणाऱ्या सर्वेक्षणासोबतच आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मार्चपासून ‘कचराघर विरहित शहर’ योजना राबविली जाणार आहे. शहराला दोन भागात विभाजित करून संकलनासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील.१५ फेब्रुवारीला मे. कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लि.चे कंत्राट संपत आहे. परंतु नवीन व्यवस्था कार्यरत होईपर्यंत कनक कं पनीकडे ही जबाबदारी कायम राहणार आहे. यामुळे नवीन व्यवस्था करावी लागणार आहे. त्यानुसार मार्च अखेरीस नवीन पॅटर्ननुसार क ाम करण्यात येईल.घराघरातून कचरा संकलन करण्यासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. ट्रान्सफर स्टेशन निर्माण करण्यात येईल. यात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. यामुळे भविष्यात डम्पिंगयार्डची गरजच भासणार नाही. तसेच डम्पिंगयार्ड येथे कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करण्यात येईल. तसेच बायोमायनिंग प्रक्रिया महिनाभरात सुरू करण्यात येईल. लँडफिल भागात प्रक्रिया करण्यात आलेल्या कचऱ्याचा वापर केला जाईल. परिणामी डम्पिंगयार्डमध्ये कचरा साठणार नाही. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

शहराचे दोन भागात विभाजनकचरा संकलनासाठी शहराचे दोन भागात विभाजन करण्यात येणार आहे. शहरातील मुख्य रस्ता वाडी(अमरावती रोड)-व्हेरायटी चौक-झिरो माईल, एलआयसी चौक-सेंट्रल एव्हेन्यू रोड ते पारडी याप्रमाणे मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजू गृहित धरून उत्तर भागात पाच झोन गृहित धरून सन २०११ च्या जनगणनेनुसार ११.३५ लाख लोकसंख्या व दक्षिण भागात पाच झोन गृहित धरून १३.६३ लाख लोकसंख्या याप्रमाणे विभाजन करण्यात येणार आहे. दोन भागातील कचरा संकलनासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे.

ट्रान्सफर स्टेशन निर्माण करणारशहरात दररोज सुमारे ८०० ते १२५० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. याप्रमाणे महिन्याला ३९ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. नवीन कंत्राट दहा वर्षांसाठी दिले जाणार आहे. शहरात १७ संकलन पॉर्इंट आहेत. येथील कंटेनरची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. बाजारभागात अधिक कचरा निघतो. अशा ठिकाणी कॉम्पेक्टर लावण्यात येतील. कचरा संकलनाची नवीन यंत्रणा उभारली जात आहे. ट्रान्सफर स्टेशन निर्माण केले जात आहे.

दहा वर्षात एक हजार कोटी खर्चकचराघर विरहित शहर ही योजना राबविण्यासाठी वर्षाला ८० ते १०० कोटींचा खर्च येणार आहे. पुढील दहा वर्षात यावर एक हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात घराघरातून कचरा संकलन करण्यात येईल. राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार नाममात्र शुल्क नागरिकांकडून वसूल करण्यात येईल. यातून नागरिकांना उत्तम व्यवस्था उपलब्ध केली जाईल. शुल्क वसुलीबाबतचा निर्णय महापालिका सभागृहात घेतला जाणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका