शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

नागपूर विद्यापीठ : एक लाख विद्यार्थ्यांची परीक्षा 'पोस्टपोन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 9:15 PM

‘कोरोना’मुळे सर्व विद्यापीठांच्या ३१ मार्चपर्यंत नियोजित सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचे राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्यात येणार आहे. यामुळे सुमारे सव्वादोनशे अभ्यासक्रमांच्या परीक्षा ‘पोस्टपोन’ कराव्या लागणार आहेत. यात एक लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार होते.

ठळक मुद्दे२२२ परीक्षांचे नव्याने वेळापत्रक बनणार : मूल्यांकन, ‘मॉडरेशन’देखील स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे सर्व विद्यापीठांच्या ३१ मार्चपर्यंत नियोजित सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचे राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यापरीक्षादेखील पुढे ढकलण्यात येणार आहे. यामुळे सुमारे सव्वादोनशे अभ्यासक्रमांच्या परीक्षा ‘पोस्टपोन’ कराव्या लागणार आहेत. यात एक लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार होते.नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना २७ फेब्रुवारीपासूनच सुरुवात झाली. या परीक्षा चार टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १३१ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश होता. त्यातील सुमारे १०० परीक्षा संपल्यादेखील आहेत. दुसऱ्या टप्प्यात १८७ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश असून, त्यांची सुरुवात १९ मार्चपासून होणार होती. १९ व २० मार्च रोजी ८५ परीक्षा होत्या. या दोन्ही टप्प्यातील सुमारे २२२ परीक्षा ३१ मार्चपर्यंतच्या तारखात नियोजित होत्या. यातील बहुतांश विद्यार्थी हे पुरवणी परीक्षेचे विद्यार्थी होते. तर ३ एप्रिलपासून सर्वात मोठा टप्पा सुरू होणार आहे. त्याला सुमारे २ लाख २० हजार विद्यार्थी बसणार आहेत.राज्य शासनाच्या निर्देशांमुळे विद्यापीठाने पहिल्या व दुसºया टप्प्यातील दीडशेहून अधिक परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच प्रात्यक्षिक परीक्षादेखील ‘पोस्टपोन’ होणार आहेत.दरम्यान, विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील मूल्यांकन, मॉडरेशन, पीएचडी वायव्हा हे सर्व कार्य ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. यासंबंधात सूचना अगोदरच देण्यात आल्या होत्या.नवीन वेळापत्रक लवकरचनागपूर विद्यापीठाला सोमवारी रात्री उशिरा उच्च शिक्षण विभागाकडून ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर निर्देश प्राप्त झाले. त्यानंतर तातडीने मंगळवारपासून ते ३१ मार्चपर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन वेळापत्रक लवकरच जारी करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.कुठल्या परीक्षा होणार ‘पोस्टपोन’पहिला टप्पा : ३५ परीक्षा (प्रमाणपत्र, पदविका परीक्षा)दुसरा टप्पा : १२१ परीक्षा (बीए, बीकॉम विषम सत्र-पुरवणी परीक्षा, नियमित बीबीए)नागपूर विद्यापीठाला सर्वाधिक फटकाराज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत नागपूर विद्यापीठात सर्वात जास्त परीक्षा घेण्यात येतात. मुंबई-पुणे विद्यापीठात पहिल्या दोन वर्षांच्या परीक्षा महाविद्यालयेच घेतात. तर इतर विद्यापीठांतील संलग्नित महाविद्यालयांची संख्या नागपूर विद्यापीठाहून कमीच आहे. विद्यापीठात सर्वच वर्षांच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे परीक्षा ‘पोस्टपोन’ केल्याने शैक्षणिक वेळापत्रक गडबडणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षात एकूण साडेआठशेहून अधिक परीक्षांचा समावेश आहे. त्यामुळे हे सर्व नियोजन करण्याचे प्रशासकीय व परीक्षा यंत्रणेसमोर आव्हान असेल. मात्र सरकारच्या निर्देशांचे आम्ही पूर्ण पालन करू, असे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोनाRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा