शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

नागपूर विद्यापीठ; अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 11:29 IST

Nagpur News Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला ५ डिसेंबरपासून सुरुवात झाली. अर्ज भरण्यासाठी आता २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२० डिसेंबरपर्यंत भरता येणार अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला ५ डिसेंबरपासून सुरुवात झाली. परंतु विविध अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही ‘ऑनलाईन’ अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी आता २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात विविध विद्यार्थी संघटनांनीदेखील मागणी केली होती.

‘कोरोना’मुळे लांबलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेचा मुहूर्त अखेर डिसेंबर महिन्यात निघाला. ‘कोरोना’ची एकूण स्थिती व हाती असलेला कमी वेळ लक्षात घेता विद्यापीठाने ऑनलाईन प्रणालीद्वारे केंद्रीभूत प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यातील अभ्यासक्रमांमध्ये एलएलएम (मास्टर ऑफ लॉ), एमकॉम (प्रोफेशनल), एमएस्सी, एमसीटी (मास्टर ऑफ कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी), मास्टर ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट व ‘एमआयआरपीएम’ (मास्टर ऑफ इंडस्ट्रिअल रिलेशन्स अ‍ॅन्ड पर्सनल मॅनेजमेन्ट) यांचा समावेश आहे. नियोजित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना १२ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करायचे होते व २० डिसेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार होती.

मात्र अनेकदा ‘सर्व्हर डाऊन’ होणे, मोबाईल अगोदरच ‘रजिस्टर’ झाला आहे, असे लिहून येणे असे विद्यार्थ्यांना संदेश आले. तर काही विद्यार्थ्यांच्या सहाव्या सत्राच्या गुणपत्रिका अवैध असल्याचे दाखविल्या गेले. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थी व संघटनांकडून करण्यात आली. अखेर विद्यापीठाने प्रवेश अर्ज भरण्याची मुदत २० डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला.

पुढील वेळात्रपक कधी?

विद्यापीठाने प्रवेश अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिली आहे. मात्र गुणवत्ता यादी जाहीर करणे, आक्षेप, पहिल्या फेरीतील पसंतिक्रम, दुसऱ्या फेरीतील पसंतिक्रम, प्रवेश इत्यादीसंदर्भातील सुधारित वेळापत्रक जारी केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून त्यासंदर्भात विचारणा करण्यात येत आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ