शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

नागपूर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 10:16 PM

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी या मागणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी या मागणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातीलकर्मचारी व अधिकाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले. कर्मचारी कामावर आले मात्र ते स्वाक्षरी करून आंदोलनाच्या ठिकाणी एकत्रित आले. यावेळी शासनाच्या दुजाभाव धोरणाचा संघटनांकडून निषेध करण्यात आला.महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन करण्यात आले. २४ सप्टेंबरला कर्मचारी कामावर आले. मात्र, ते स्वाक्षरी करून आंदोलनाच्या ठिकाणी एकत्रित जमले. महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाने अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामधून वगळल्याने राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात आवाज बुलंद केला आहे. वेतन आयोगासाठी राज्यभर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यावर शासनाने यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वाासन दिल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र, शासनाकडून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप संघटनांकडून लावण्यात आला. मागण्या पूर्ण न झाल्यास १ ऑक्टोबरपासून काम बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफिसर्स फोरम, महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिक्षकेतर सेवक संघ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ बहुजन कर्मचारी संघटना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कर्मचारी संघ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अधिकारी फोरम या संघटना यात सहभागी झाल्या होत्या. डॉ. पुरण मेश्राम, डॉ. अनिल हिरेखण, प्रवीण गोतमारे, मनीष झोडापे, दिनेश दखने, बाळू शेळके, मारोती बोरकर, सुधाकर पाटील, राजेंद्र पाठक, प्रदीप मसराम, चंद्रमणी सहारे, डॉ. वंदना खेडीकर, सुचित्रा मेंढे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. शिवाय कृती समितीच्या सदस्यांनी विभागीय उच्चशिक्षण सहसंचालकांचीदेखील भेट घेतली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठagitationआंदोलनEmployeeकर्मचारी