फसवणूक झाल्याने तरुण चढला १५० फूट उंच हायमास्ट टॉवरवर; नागपुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 21:44 IST2020-08-08T21:06:38+5:302020-08-08T21:44:01+5:30
आकाशवाणी चौकातील टॉवरवर मनोज नावाचा तरुण चढल्याचे आढळले. हे वृत्त कळल्यावर त्याला खाली उतरवण्यासाठी यंत्रणेची भंबेरी उडाली. हे वृत्त लिहिस्तोवर त्या तरुणाला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू होते.

फसवणूक झाल्याने तरुण चढला १५० फूट उंच हायमास्ट टॉवरवर; नागपुरातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: आकाशवाणी चौकातील टॉवरवर मनोज नावाचा तरुण चढल्याचे आढळले. हे वृत्त कळल्यावर त्याला खाली उतरवण्यासाठी यंत्रणेची भंबेरी उडाली. हे वृत्त लिहिस्तोवर त्या तरुणाला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू होते.
मनोज नावाचा हा तरुण इलेक्ट्रिक टॉवर बनवण्याऱ्या कंपनीत तांत्रिक कामगार आहे. त्याची फसवणूक करून त्याच्यावर कर्ज चढल्याचे सांगितले जाते. त्याच्याजळ ब्लेड असून त्याने स्वत:चा हात कापल्याचेही वृत्त आहे.. याखेरीज त्याच्याजवळ दोर असून त्याने गळफास लावण्याचाही प्रयत्न चालविला आ हे.. तो खाली उतरायला तयार नाही.. त्याला समजावण्यासाठी गेलेले पथक परत आले आहे..
सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.
सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.