शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

नागपूर वाहतूक पोलिसांचा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा ‘हंटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:43 IST

नागपूरकरांना वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. मात्र स्वत:च्या जबाबदारीची जाणीव नसलेल्या नागरिकांकडून सर्रासपणे वाहतुकीचे नियम तोडले जातात. या वर्षातील अवघ्या सहा महिन्यांत वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या सव्वा लाखांहून अधिक नागरिकांवर कारवाई झाली आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा कारवाईचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र आहे. माहितीच्या अधिकारातून वाहतुकीच्या बेशिस्तीची ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यात नियम तोडणाऱ्या १ लाख ३३ हजार ५४२ वाहनचालकांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरकरांना वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. मात्र स्वत:च्या जबाबदारीची जाणीव नसलेल्या नागरिकांकडून सर्रासपणे वाहतुकीचे नियम तोडले जातात. या वर्षातील अवघ्या सहा महिन्यांत वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या सव्वा लाखांहून अधिक नागरिकांवर कारवाई झाली आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा कारवाईचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र आहे. माहितीच्या अधिकारातून वाहतुकीच्या बेशिस्तीची ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपुरातील वाहतुकीसंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. नागपुरात घडलेल्या वाहतूक नियम उल्लंघनाची प्रकरणे, दंडातून प्राप्त झालेला महसूल, सायलेन्स झोनमध्ये झालेली कारवाई इत्यादीबाबत त्यांच्याकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. १ जानेवारी २०१८ ते ३० जून २०१८ या कालावधीत नागपूर शहरात वाहतुकीचे नियम तोडणाºया एकूण १ लाख ३३ हजार ५४२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. यात अतिवेगाने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलणे, हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे तसेच ‘ट्रिपलसीट’ वाहन चालविणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.सिग्नल तोडणाऱ्या ९ हजार ४७१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या नागरिकांकडून १६ लाख ४० हजार ९०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. तर ‘सीटबेल्ट’ न लावता चारचाकी चालविणाऱ्या ४ हजार ९८ नागरिकांना पकडण्यात आले व त्यांच्याकडून ८ लाख ३ हजार ६०० रुपये वसूल करण्यात आले. मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या ३ हजार ९८६ वाहनचालकांवर कारवाई झाली व त्यांच्याकडून ७ लाख १ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर हेल्मेट न घालणाऱ्या २१ हजार ८७ दुचाकीस्वारांना ७६ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांकडून २ कोटींचा दंड वसूलसहा महिन्यांच्या कालावधीत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या तब्बल १० हजार २०५ नागरिकांवर कारवाई झाली. या मद्यपींकडून थोडाथोडका नव्हे तर २ कोटी ३० लाख ६६ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ‘सायलेन्स झोन’चे उल्लंघन करणारे अवघे सतराच वाहनचालक सापडले व त्यांना २१ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

आॅटोचालक नियम कधी पाळणार ?शहरातील विविध भागांमध्ये आॅटोचालकांकडून बेदरकारपणे आॅटो चालविण्यात येतात. शिवाय नियमांचेदेखील मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याची नागरिकांची ओरड असते. नियम न पाळल्याबद्दल १५९६४ आॅटोचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून ३१ लाख ९८ हजार रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले

ट्रक, मोटार, बस जीवघेणेजानेवारी २०१५ ते जून २०१८ या कालावधीत ट्रक, कार व बसमुळे सर्वाधिक  १६०४ अपघात झाले व यात ४४६ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. ट्रकमुळे  ५६२ अपघात झाले व यात सर्वात जास्त २६३ नागरिकांचा हकनाक बळी गेला.

गुन्हा                        प्रकरणे            दंड (रुपयांमध्ये)अतिवेग                    २१                २१,७००सिग्नल तोडणे           ९,४७१          १६,४०,९००मोबाईलवर बोलणे    ३,९८६          ७,०१,१००हेल्मेट न घालणे        २१,०८७         ७६,३३,५००सिटबेल्ट                  ४,०९८            ८,०३,६००ट्रीपलसीट               ३,६७९            ६,२४,८७०सायलेन्स झोन           १७                २१,४००ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह     १०,२०५            २,३०,६६,४५०

ट्रक, बस, मोटारीमुळे झालेले मृत्यू (२०१५ ते जून २०१८)वाहन            अपघात            मृत्यूट्रक            ५६२                २६३मोटार        ९०१                १२६बस            १४१                ५७

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर