शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन धावत्या ट्रेनमधून गुन्हेगार पळाला, हावडा दुरंतो एक्सप्रेसमधील घटना

By नरेश डोंगरे | Updated: June 3, 2023 22:52 IST

Crime News: धावत्या ट्रेनमधून पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक गुन्हेगार पळून गेला. शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास १२२२२ हावडा - पुणे दुरंतो एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली.

- नरेश डोंगरेनागपूर - धावत्या ट्रेनमधून पुणेपोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक गुन्हेगार पळून गेला. शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास १२२२२ हावडा - पुणे दुरंतो एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. आरोपीचे नाव संजय जाना (वय ३०) असून तो पुणे येथील रहिवासी असल्याचे समजते.

पुणे येथील फरसखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूकीच्या (कलम ४०६, ४२०) गुन्ह्यात आरोपी संजय फरार होता. त्याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्याला हावडा-पुणे दुरंतो एक्सप्रेसच्या बी-८ कोचमध्ये बसवून पोलीस पुण्याकडे घेऊन जात होते. नागपूरहून शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास रेल्वेगाडी बुटीबोरीकडे असताना गुमगावजवळ त्याने बाथरुमला जायचे आहे, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला टॉयलेटजवळ नेले. आरोपी संजयने आतून दार बंद केले. बराच वेळ होऊनही तो बाहेर येण्याचे नाव घेत नसल्याने पोलिसांनी टॉयलेटचे दार ठोठावले. आतून प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांना शंका आली. त्यानंतर कसेबसे दार उघडले असता आरोपी टॉयलेटची खिडकीची काच तोडून उडी घेऊन पळून गेल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली.

३६ तासानंतरही छडा नाहीया घटनेला आता जवळपास ३६ तास झाले. मात्र, फरार झालेल्या संजयचा छडा लागला नाही. दरम्यान, ही घटना रेल्वे पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाला कळविण्यात आली असून बुटीबोरी आणि नागपूर पोलिसांनाही ही माहिती देण्यात आली. तेव्हापासून रेल्वेसह स्थानिक पोलीसही आरोपी संजयचा शोध घेत आहेत. या संबंधाने रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरPuneपुणेPoliceपोलिस