ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा संशयास्पद मृत्यू, काही तासांपासून होते बेपत्ता

By योगेश पांडे | Updated: June 8, 2023 16:06 IST2023-06-08T16:04:52+5:302023-06-08T16:06:02+5:30

घरातील विहिरीत आढळला मृतदेह

Nagpur : Suspicious death of senior journalist Arun Phanshikar, body found in the well in the house | ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा संशयास्पद मृत्यू, काही तासांपासून होते बेपत्ता

ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा संशयास्पद मृत्यू, काही तासांपासून होते बेपत्ता

नागपूर : ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. गिरीपेठ येथील घरच्या विहीरीत त्यांचा मृतदेह आढळला.

फणशीकर सकाळी वॉकला निघाले होते. मात्र बराच वेळ होऊनादेखील ते घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. परिचयातील लोकांकडे ते न आढळल्याने सोशल मीडियावर देखील माहिती प्रसारित करण्यात आली, तसेच सीताबर्डी पोलीस ठाण्यातदेखील सूचना देण्यात आली. बरीच शोधाशोध केल्यानंतर त्यांच्या घराच्या विहिरीतच त्यांचा मृतदेह आढळला. ते नेमके कशामुळे विहिरीत पडले याचा तपास सुरू आहे. त्यांच्या मृत्यूमुळेनागपूरच्या पत्रकार जगतात शोककळा पसरली आहे. त्यांनी अनेक मोठ्या वृत्तपत्रात पत्रकारिता केली होती. तसेच अनेक पत्रकारांचे ते मार्गदर्शकदेखील होते. नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातदेखील त्यांनी शिकविले होते.

Web Title: Nagpur : Suspicious death of senior journalist Arun Phanshikar, body found in the well in the house