नागपूर : एसपीयूच्या जवानाने स्वतःला घातली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 18:23 IST2021-07-03T18:22:28+5:302021-07-03T18:23:37+5:30

कोरोना नंतर झाला म्युकरमायकोसिस. मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने केली आत्महत्या.

Nagpur An SPU jawan shot himself after coronavirus and mucormycosis | नागपूर : एसपीयूच्या जवानाने स्वतःला घातली गोळी

नागपूर : एसपीयूच्या जवानाने स्वतःला घातली गोळी

ठळक मुद्देकोरोना नंतर झाला म्युकरमायकोसिस. मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने केली आत्महत्या.

नागपूर :  विशेष सुरक्षा पथकात (एसपीयू) कार्यरत पोलिस कर्मचारी प्रमोद शंकरराव मेरगुवार (४६) यांनी स्वतःला गोळी मारून केली आत्महत्या. केली. शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. ती उघड झाल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली.

गेल्या पाच वर्षांपासून प्रमोद विशेष सुरक्षा पथकात कार्यरत होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांना कोरोना झाला. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांचे म्युकरमायकोसिसचे ऑपरेशन झाले. त्यानंतर डोळे आणि डोक्याचा त्यांना त्रास होऊ लागला. 

कुटुंबीयांनी त्यांच्यावर हैदराबाद येथेही उपचार केले. मात्र, पाहिजे तसा लाभ झाला नाही. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडली. मनोबल नसल्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून कमालीचे अस्वस्थ होते. या पार्श्वभूमीवर, आज दुपारी त्यांनी आपल्या मानकापूरातील घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

Web Title: Nagpur An SPU jawan shot himself after coronavirus and mucormycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.