नागपुरात सहा जणांनी लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 11:56 PM2020-06-19T23:56:45+5:302020-06-19T23:58:58+5:30

शहरातील विविध भागात गेल्या २४ तासात सहा जणांनी गळफास लावून आत्महत्या केली. यात तीन तरुणांचाही समावेश आहे. या घटनांमुळे विविध भागात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

In Nagpur, six people hanged themselves | नागपुरात सहा जणांनी लावला गळफास

नागपुरात सहा जणांनी लावला गळफास

Next
ठळक मुद्दे२४ तासात घडल्या घटना : तीन तरुणांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील विविध भागात गेल्या २४ तासात सहा जणांनी गळफास लावून आत्महत्या केली. यात तीन तरुणांचाही समावेश आहे. या घटनांमुळे विविध भागात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नारायण पेठमध्ये राहणारे विवेक माणिकराव लाडकर (वय ३०) यांनी गुरुवारी सकाळी १०च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. मंगेश माणिकराव लाडकर यांनी दिलेल्या सूचनेवरून शांतीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. विवेक यांच्या आत्महत्येचे कारण जाणून घेतले जात आहे.
हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आम्रपाली नगरात राहणारे जगन्नाथ गुणवंतराव ठाकरे (वय ६२) यांनी गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. आतिश रमेश कडबे यांनी दिलेल्या सूचनेवरून हुडकेश्­वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
एमआयडीसीतील हिंगणा मार्गावर राहणारे दिलीप दास (वय ३५) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सुधा दिलीप दास यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
दास यांच्या आत्महत्येमागील कारण जाणून घेतले जात आहे.
इमामवाड्यातील पाचनळ चौकात राहणारे अमोल जीवन पोटपोसे (वय २५) यांनी गळफास लावून घेतला. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास ही बाब उघडकीस आल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
हुडकेश्वरमधील गुरुकुंज नगरात राहणारे शालिकराम माणिकराव धारपुरे (वय ७०) यांनी शुक्रवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. शीतल अनिल धारपुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
मानकापुरातील नर्मदा हाऊसिंग सोसायटीत राहणारे अभिषेक अभय दुबे (वय २०) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीवरून मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण जाणून घेतले जात आहे.

स्टोव्हच्या भडक्याने तरुणाचा मृत्यू
कामठी मार्गावरील नाका नंबर २ जवळ राहणारा हमाम रशीद शेख (वय २०) याचा स्टोव्हचा भडका उडून भाजल्यामुळे मृत्यू झाला. ६ जूनला रात्रीच्या वेळी तो पाणी गरम करत असताना स्टोव्हचा भडका उडाला. त्यामुळे तो गंभीररीत्या भाजला होता. त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी दुपारी ११.५० च्या सुमारास डॉक्टरांनी हमाम याला मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून कपिलनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

Web Title: In Nagpur, six people hanged themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.