शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नागपुरात सहा बिल्डर्सच्या १८ प्रतिष्ठानांवर प्राप्तीकर पथकांच्या धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 8:20 PM

प्राप्तीकर विभागातील दक्षता शाखेच्या पथकांनी मंगळवारी सहा बड्या बिल्डर्सच्या नागपूरसह विदर्भातील १८ व्यावसायिक व रहिवासी ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकल्या. अतिशय गुप्त पद्धतीने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे मालमत्ता व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अलीकडच्या काळातील ही विदर्भातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देबेनामी मालमत्ता जप्त : हिशेबात नसलेले कोट्यवधी रुपये वापरल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्राप्तीकर विभागातील दक्षता शाखेच्या पथकांनी मंगळवारी सहा बड्या बिल्डर्सच्या नागपूरसह विदर्भातील १८ व्यावसायिक व रहिवासी ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकल्या. अतिशय गुप्त पद्धतीने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे मालमत्ता व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अलीकडच्या काळातील ही विदर्भातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. 

महालक्ष्मी बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स, ऑरेंज सिटी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड व हिंगणा येथील अतुल युनिक सिटीचे प्रमुख अतुल यमसनवार, त्यांचे नातेवाईक प्रशांत बोंगिरवार व भागीदार राहुल उपगंलावार यांच्यासह मंगलम बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स, अपूर्वा बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स व अग्नी बिल्डर्सचे अ‍ॅड. चंद्रकांत पद्मावार, डॉ. सुधीर कुन्नावार आणि पिरॅमिड रियल्टर्सचे विश्वास चकनावार यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. तसेच, या बिल्डर्सशी संबंधित इतर काही व्यावसायिकांवरही कारवाई झाल्याची माहिती मिळाली आहे. कारवाईमध्ये नागपुरातील धरमपेठ, अजनी चौक, सावरकरनगर, सोमलवाडा चौकसह हिंगणा, यवतमाळ, घाटंजी, भंडारा, चंद्रपूर, बिलासपूर, इंदूर, आर्णी व पुसद येथील ठिकाणांचा समावेश आहे. कारवाईमध्ये ८० ते ९० अधिकाऱ्यांचा समावेश होता. सकाळी ७.३० वाजता सुरू झालेली करवाई सायंकाळी अहवाल दाखल करतपर्यंत सुरू होती. सूत्रांच्या माहितीनुसार, कारवाई पथकांना बेनामी मालमत्ता, कृषी जमीन व अन्य मालमत्तेसंदर्भातील कागदपत्रे आणि मोठी बेहिशेबी रोख रक्कम मिळून आली आहे. त्यामुळे कारवाई बुधवारीही सुरू राहू शकते.हे सर्व बिल्डर्स एकमेकांचे नातेवाईक आहेत किंवा त्यांचे एकमेकांसोबत व्यावसायिक संबंध आहेत. त्यांच्याकडे शेकडो बेनामी मालमत्ता असल्याचा प्राप्ती कर विभागाला संशय आहे. त्यापैकी मोठी मालमत्ता कृषी जमीन आहे. ते कृषी जमिनीला अकृषक करतात व त्यावरील भूखंड रहिवासी उपयोगाकरिता विकून मोठा नफा कमावतात. हे सर्व बिल्डर्स कधी स्वतंत्रपणे तर, कधी संगनमत करून व्यवसाय करतात. त्यांनी बेनामी मालमत्ता खरेदी करण्यासाठी हिशेबात नसलेले कोट्यवधी रुपये वापरल्याचा संशय आहे. त्यामुळे प्राप्ती कर पथकाने बेनामी व्यवहार कायदा व मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत ही कारवाई केली. मालकांना कोणत्याही प्रकारची भरपाई अदा न करता त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार प्राप्ती कर विभागाला बेनामी व्यवहार कायद्यांतर्गत देण्यात आला आहे असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Income Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयraidधाडnagpurनागपूर